manoj jarange patil kunbi certificate Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : प्रमाणपत्र का मिळत नाही? मराठा आमदारांना जाब विचारा : सहकार्य करणार नाही, त्याला 2029 मध्ये पाडा! मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

Kunbi Certificate Issue : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना कुणबी प्रमाणपत्राबाबत जाब विचारण्याचे आवाहन करत सहकार्य न करणाऱ्या आमदारांना 2029 च्या निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा समाजाला सत्तर वर्षातं मिळालं नाही, ते आपण आरक्षणाचा लढा उभारून मिळवलं आहे. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळायला थोडा उशीर लागतो आहे, पण आपल्याला सबुरीने घ्यावे लागेल. मराठा समाज मोठा आहे, आपल्यावर जळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मराठा समाजाने (ता.11) उद्यापासून आपापल्या मतदारसंघातील मराठा आमदारांना जाब विचारावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.

तुमच्या सरकारने जीआर काढला आहे, मग आम्हाला प्रमाणपत्र का मिळत नाही? प्रमाणपत्र काढून देण्यासाठी जो आमदार सहकार्य करणार नाही, त्याला 2029 च्या विधानसभेत पाडा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील माकणी या गावातील एका धार्मिक कार्यक्रमात म्हटले. आम्हाला राजकारणाचा नाद नाही, नाहीतर आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीतच धुराळा उडवला असता. पण मराठा समाजाच्या लेकरांसाठी जो प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मदत करणार नाही, त्याला आम्ही येणाऱ्या निवडणुकीत पाडणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

प्रमाणपत्र वाटप करा, तहसीलदारला आणि एसडीओला फोन करा, त्यांच्या ऑफिसला जाऊन बसा. सगळ्या मराठा समाजाने आपापल्या तालुक्यातील आमदाराला बोला. साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी प्रमाणपत्र हवे आहे, ते काढण्यासाठी आमदारांनी मदत केली पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा आमदाराला बोललं पाहिजे. ज्या समाजाने तुम्हाला आमदार केले, त्यांच्यासाठी जीआर आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदाराला व्हिडिओ काॅल करा, कलेक्टरला बोलावं.

आणि जर बोलणार नसले तर तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिला. मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो उद्यापासून (ता.11) किमान तुम्ही आपल्या आमदाराला पुढे घाला. त्यांना विचारा तुमच्या सरकारने जीआर काढला, मग आमच्या लेकरासाठी प्रमाणपत्र का देत नाहीत? त्या भागातील आमदाराचीसुद्धा सगळ्यांना प्रमाणपत्र काढून देण्याची जबाबदारी आहे. पण ते खुशाल घरी झोपा काढत आहेत.

मतदानाच्या दिवशी मात्र आमच्या पाटलांचे मतदान त्यांना लागतं. त्यामुळे सरकारने जीआर काढल्या प्रमाणे गरीब मराठ्याला प्रमाणपत्र द्या, आमदारांना मनापासून व हात जोडून विनंती आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांनो तुम्ही तहसीलदारला फोन करून विचारा. कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, तहसीलदारला आणि एसडीओ ऑफिसला जाऊन बसा. आणि जर ते बोलणार नसतील तर तुम्हाला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, याचा पुनरुच्चारही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT