Manoj Jarange Patil: मला एक वर्ष द्या, तुमचे सगळे प्रश्न सोडवतो; मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाला शब्द!

Maratha Reservation News: निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे आयोजित 'जागृत देवस्थान श्री हनुमान आराधना' कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : माझ्याकडे धनगर, मुस्लिम, दलित अशा कोणत्याही जातीतील व्यक्ती आला तरी मी त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मी कधीच जातीवाद केला नाही, मराठा समाजाला आरक्षण तर मिळाले मात्र त्यांचे दैनंदिन निर्माण होणारे प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मला फक्त एक वर्ष द्या तुमचे सर्वच प्रश्न मी सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे आयोजित 'जागृत देवस्थान श्री हनुमान आराधना' कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एका बाजूला आध्यात्मिक वातावरण आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेले जरांगे पाटील यांची उपस्थिती यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची गावांमध्ये रथातून मारुती मंदिरापर्यत मिरवणूकही काढण्यात आली.

मी कधीच जातीभेद केला नाही, कोणत्याही जातीच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा समाजातील शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांची मुलं मोठ्या पदावर गेली पाहिजेत हाच मला ध्यास आहे. जोपर्यंत स्वतंत्र पद्धतीने आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. मराठा समाजाला तर आरक्षण दिले परंतु केवळ आरक्षणामुळे हा प्रश्न सुटणार नाही. तर त्यांच्या कुटुंबातील मूलभूत अडचणीही आपण सोडवल्या पाहिजेत.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News: मोठी बातमी: आता अजितदादांचं नाव वापरण्यासाठी कुटुंबियांची परवानगी बंधनकारक, आयुक्तांनी काढले फर्मान

मराठा समाजातील त्यांचे आरक्षणासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. याबाबतही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून हे काही राजकीय व्यासपीठ नाही तर एक आध्यात्मिक व्यासपीठ आहे. या गावातील हनुमान आराधनेचा प्रसाद आपण घेऊ, येथील श्रद्धा व प्रसाद नक्कीच भविष्यातील आंदोलनासाठी प्रेरक ठरेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com