narayan rane manoj jarange patil.jpg sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "फुकट धमक्या देऊ नये, अन्यथा कोकणात सुद्धा फिरून देणार नाही," जरांगे-पाटलांचा नारायण राणेंना इशारा

Manoj Jarange Patil On Narayan Rane : "निलेश राणे यांनी वडिलांना समजून सांगावं. मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही," असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं आहे.

Akshay Sabale

Manoj Jarange Patil Vs Narayan Rane : मी गणेशोत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो, असा एकेरी उल्लेख करत खासदार नारायण राणे यांनी इशारा दिला होता. यानंतर जरांगे-पाटील यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फुकट धमक्या नाही द्यायच्या. धमक्यांना मी घाबरत नाही, असं जरांगे-पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) ठणकावून सांगितलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नारायण राणे काय म्हणाले?

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, गणेशोत्सव संपताच मी मराठवाड्यात चाललो आहे. सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी मराठवाड्यात जाणार आहे. तुम्ही कुणी यावं नाही यावं, मी जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो," असं म्हणत नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी ललकारलं आहे.

"तसेच, देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत. उद्या देवेंद्र फडणवीस आणि रस्त्यावर आलं पाहिजे. कुणी आपल्या नेत्याच्या वाटेला आलं नाही पाहिजे," असं आवाहन नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं.

जरांगे-पाटलांनी काय म्हटलं?

राणेंच्या इशाऱ्यावर जरांगे-पाटील म्हणाले, "मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नका, असं बोललोच नाही. ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे. मी नारायण राणे यांचा आदर करतो. मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल."

"निलेश राणे यांनी वडिलांना समजून सांगावं. मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. बोलायला लागलो, तर थांबणार नाही. फुकट धमक्या द्यायच्या नाहीत. मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT