Manoj Jarange Patil : दरेकरांच्या अभियानात सहभागी `अतृप्त आत्मे` आम्ही शोधत आहोत..

Manoj Jarange's allegations against Fadnavis, Darekar : दोन,तीन दिवस थांबा सध्या जे चालू आहे याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबई, मलबार हिल, अंधेरीसह काही ठिकाणी दरेकर यांनी आमच्या विरोधात बैठका घेतल्या आहेत. आंदोलकाच्या पाठीशी कोण उभं करायचं ही चर्चा या बैठकीत झाली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Maratha Reservation News : मुंबईत मातोश्री बाहेर काल आंदोलन केले, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्या समोर काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे आता आम्ही टेन्शन घेत नाही, रात्रीपासून मि आणि समाजाने टेन्शन घेणं बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून 12-13 संघटना दरेकर यांनी गोळा केल्या आहेत.

दरेकर यांच्या अभियानात सहभागी होऊ नका, या अभियान बाबत माहिती आम्ही घेत आहोत. कुठे कुठे मराठा संघटनाचे अतृप्त आत्मे उपस्थित होते ते लवकरच कळेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लवकरच या अभियानाचा आपण पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर हल्ला चढवला.

दोन,तीन दिवस थांबा सध्या जे चालू आहे याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबई, मलबार हिल, अंधेरीसह काही ठिकाणी आमदार प्रविण दरेकर यांनी आमच्या विरोधात बैठका घेतल्या आहेत. आंदोलकाच्या पाठीशी कोण उभं करायचं ही चर्चा या बैठकीत झाली. आणखी काही लोक उघडे पडणार आणि मला उघड पाडण्यासाठी हे सगळे गोळा केले जात आहेत. त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत, जाळपोळ करून गाड्या फोडायचा त्यांचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; शिंदे समितीचा अहवाल विधानसभेनंतरच !

आंदोलन चिघळवण्याचा डाव..

भाजपा आमदार दरेकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजपला संपवून टाकू नका, असेही जरांगे म्हणाले. भूमिका काय आहे हे सरकारने विरोधी पक्षाला विचारले पाहिजे, ते त्यांच काम आहे. नेत्यांना जाब विचारायला मराठा समाज खंबीर आहे, आंदोलक आमचे भाऊ आहेत. (Maratha Reservation) त्यांनी फडणवीस आणि दरेकर यांचे ऐकू नये हे तुम्हाला तोंडावर पाडतील, असा इशारा मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी दिला.

दरेकर यांच्या अभियानात कुणीही सहभागी होऊ नका. एका क्रांती मोर्चाचे दरेकर यांनी 3 क्रांती मोर्चे केले, हे मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवत आहेत. तुम्ही कुणाच्याही दारात जाब विचारायला जाऊ नका,हे सगळे लोक फडणवीस यांचे ऐकून मराठयांच आंदोलन चिघळवण्यासाठी तिथे जात आहेत. मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, तुम्हाला कोणताही समीकरण जुळवण्याची गरज पडणार नाही.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : राज्यात आता गोरगरिबांची लाट, सत्ता परिवर्तनासाठी तयार राहा..

ईडब्ल्यूएसचा घोळ मिटवा..

आमचे लोक गोळा करून फडणवीसच संपणार आहेत. फडणवीस यांनी हे सांगितल्या शिवाय हे आंदोलन होऊच शकत नाही. फडणवीस आमचे लोक गोळा करून त्यांना संपवू नका. पोलीस भरतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस बाबतचा विषय सध्या सुरू आहे. आम्ही हे आरक्षण रद्द करू नका असं म्हणालो होतो. ईसीबीसी दिलं तर ठेवा पण इडब्ल्यूएस, ओबीसी रद्द करू नका असे म्हणालो होतो.

ज्यांना जे आरक्षण घ्यायचं ते घेतील असे स्पष्ट केले होते. काही वेळापूर्वी शंभुराजे यांच्याशी बोलणे झाले होते. आम्ही तातडीने लक्ष घालतो मुख्यमंत्र्यांना भेटतो असं ते म्हणाले. सरकारने हा ईडब्लूएसचा घोळ तातडीने मिटवावा, असे मी सांगितले आहे. पण काही लोक मराठा समाजाच्या तरुणांची खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस भरतीतील कट आॅफ वरून होत असलेल्या आरोपाला जरांगे पाटील यांनी उत्तर दिले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : घबराट, अशक्तपणा अन् लो ब्लडप्रेशर ; मनोज जरांगे यांना सलाईन..

संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली त्याबद्दल सरकारला धन्यवाद. परंतु त्या समितीला काम करायला लावा, नुसती मुदतवाढ महत्वाची नाही, आम्ही समितीला रेकॉर्ड शोधायला लावतो असे आम्हाला सांगण्यात आले. पण रेकॉर्ड तपासणी बंद असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com