Manoj Jarange Patil Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Angry : मनोज जरांगे प्रचंड संतापले, एकनाथ शिंदे-संजय जाधवांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, 'मराठ्यांच्या उरावर मेळावा...'

Manoj Jarange Patil Vs Sanjay Jadhav Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले की, परभणीमध्ये खासदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेत असलेला कार्यक्रम रद्द करा.

Roshan More

Manoj Jarange News : आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणी दौऱ्यावर येणार असून खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तेथे ते मार्गदर्शन करणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत हा मेळाव्या लगेच रद्द करण्याची मागणी केली आहे. खासदार संजय जाधव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत मराठ्यांच्या उरावर हा कार्यक्रम घेताय का? असा सवाल केला.

'आमच्या उरावर कार्यक्रम घ्यायची काय गरज आहे. अजिबात तु्म्ही मतदारसंघात कार्यक्रम घ्यायचा नाही. बंडू जाधव तुमच्यामुळे राज्यात वातावरण खराब होईल. शिंदेंना परत नांदेडला जायचं आहे. तुझ्यामुळे शिंदेला इथच राहायची वेळ येईल.', असा इशाराही जरांगेनी दिला.

मनोज जरांगे यांनी खासदार जाधव यांच्याशी फोनवर देखील संवाद साधत कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले आहे. तर, जाधव यांनी दहा मिनिटात सांगतो, असे म्हटले आहे. दरम्यान, 'दहा मिनिटात सांगतोय म्हणालाय पण त्याला फारच खुमखुमी आली तर बघतोच मी.', असे जरांगे म्हणाले.

गाडी तयार...

मनोज जरांगे म्हणाले, मी गाडी तयार ठेवायला सांगितली आहे. जर का मेळावा घेतला तर मी उपोषण थांबवून गाडीने तिकडे जातो आणि बघतोच. आमच्या लेकरांचं वाटोळं करून टाकलय संजय शिरसाटनं. खरे प्रमाणपत्र असून आमच्या पोरांची प्रमाणपत्र रद्द केली, कशाला कार्यक्रम घ्यायचाय? शेतकऱ्यांच्या नावाखाली मराठ्यांच्या उरावर नाचायला शिंदेला आणताय का? .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT