Manoj Jarange : 'गद्दारीचा डाग आमच्यामुळे पुसला, डबल गेम...', मनोज जरांगे एकनाथ शिंदेंना नको नको ते बोलले

Manoj Jarange Criticises Eknath Shinde: शिंदेसाहेब आमच्यावर उद्धव ठाकरे बंर म्हणणाची वेळ येणार आहे. बरं म्हणावं लागलं कारण तुमच्या गद्दारीचा ठाग आम्ही पुसलाय, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange targets Eknath Shinde
Manoj Jarange targets Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Press Conference: 'गद्दारीचा डाग आमच्यामुळे फुसला, डबल मराठवाड्यातील जिल्हा परिषदचे सदस्यांची कुणबी प्रमाणपत्र जात पडताळीमध्ये अवैध ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. सरकारवर करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भूमिकेवर प्रश्निचिन्ह उपस्थित करत त्यांना सुनावले.

मनोज जरांगे म्हणाले, 'शिंदेंसाहेब मराठे वेडे नाहीत, तुम्हाला जातवान मराठा समजत होतो म्हणून जीवापाड तुमच्यावर प्रेम करत होतो. शिंदेसाहेब आमच्यावर उद्धव ठाकरे बंर म्हणणाची वेळ येणार आहे. बरं म्हणावं लागलं कारण तुमच्या गद्दारीचा ठाग आम्ही पुसलाय.'

'आम्ही त्यावेळी मीडियात जाहीरपणाने सांगितलं, तुमचा पक्ष फूटू काही होऊ शिंदेसाहेब नोंदी शोधायला मदत करातायेत बाकी आम्हाला काही देणंघेणं नाही तुमच्या भांडणाशी. ही परत फेडत करता आमच्या उपकाराची?', असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार. मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही. 'आम्ही लोकं अंगावर घ्यायची. लोकं पैसे घेतात आम्ही कुणाचे आठआणे घेतले नाहीत. जातवान असाल तर दाखवून द्या शिंदेसाहेब.' असे आव्हान देखील जरांगे यांनी दिले.

'एकनाथ शिंदेंसाहेबांकडून कट असेल तर उदय सामंत, शंभूराज देसाईंची मेहनत वाया गेली ना. कारण त्यांच्या ऑफीसमध्ये मराठ्यांना विरोध करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होतात. बाळासाहेब भवनमध्ये तेच प्रवक्ते नेते एकमेकांना शिव्या देतात. मराठा म्हणून आम्ही तुम्हाला तळहातासारखे वागवतो पण तुम्ही ओबीसी आमच्या अंगावर घातले. तुम्ही लीडर आहेत पण तुमच्यापेक्षा शंभूराज देसाई, उदय सामंत यांना चांगलं म्हटलं पाहिजे. ', असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com