Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil sarkaranama
मराठवाडा

Manoj Jarange Patil :...अन्यथा 'करेक्ट' कार्यक्रम करू; जरांगे-पाटलांचा इशारा कुणाला?

Akshay Sabale

Jalna News, 12 June : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. पहाटे प्रकृती खालावल्यानंतर जरांगे-पाटील यांना तीन सलाईन लावण्यात आल्या. डॉक्टरांनी समजूत काढल्यानंतर जरांगे-पाटील यांनी सलाईन लावून दिल्याची माहिती आहे.

पण, माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. जर, सरकारनं आरक्षण दिलं नाही, तर सलाईन काढून फेकीन, असा इशारा जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. आरक्षण दिलं तर ठीक अन्यथा आरक्षण देणारे लोक आम्ही बनवू, असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही. सगेसोयऱ्याच्या अंमलबाजवणीला 5 महिने वेळ लागतो का? हा प्रश्न तडीस नेतो, असं आश्वासन दिलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस नेणाऱ्या मंत्र्यांचं नाव उघड घेऊन कौतुक करणार," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

लोकसभेला फटका बसल्यानं आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येतंय का? या प्रश्नावर जरांगे-पाटील म्हणाले, "यापूर्वीही 17-17 दिवस सरकारनं आमच्या उपोषणाकडे दुर्लक्षच केलं आहे. लोकसभेला फटका बसल्यामुळे दुर्लक्ष करत असतील, तर विधानसभेला यापेक्षा मोठा फटका बसेल.

वेळप्रसंगी उमेदवार देणार नाही, पण एका-एकाची जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे. सरकार जर मज्जा बघत असेल, तर विधानसभेला विकेट काढणार आहे."

सरकारला वेठीस धरण्यात येत आहे, असा आरोप मंत्र्याकडून करण्यात आला. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, "असं म्हणणाऱ्या शहाण्या मंत्र्यानं आपल्या मुलाला 10 टक्के आरक्षण द्यावं. मंत्र्यानं निट राहावं आणखी वातवरण बिघडवू नये. 10 टक्के आरक्षण आम्ही मागितलं नाही."

"सरकारनं आम्हाला वेठीस धरलं आहे. 10 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्ही शेतकरी, गरीब लोक आहोत. सरकार आमचा किती दिवस छळ करतेय, ते पाहू. अन्यथा सरकारचा 'करेक्ट' कार्यक्रम करू," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT