Manoj Jarange Patil : गोड बोलून शिंदे सरकार मराठ्यांचा काटा काढतंय!

Manoj Jarange Patil Allegation of Government over Maratha Reservation : सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे,
eknath shinde devendra fadnavis manoj jarange patil
eknath shinde devendra fadnavis manoj jarange patil sarkarnama

सगे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासांठी मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील पुन्हा बेमुदत उपोषणास बसले आहेत. चौथ्या दिवशी जरांगे-पाटलांनी प्रकृती खालवली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी जरांगे-पाटलांनी शिंदे सरकारला ( Shinde Govt ) लक्ष्य केलं आहे.

"सरकारकडून कोणताही संपर्क करण्यात आला नाही. उपोषण कठोर सुरू आहे. बैठका घेऊन निर्णय घेऊ अशी लाडीगोडी सरकारकडून मराठ्यांना दाखवली जात आहे. गोड बोलून काटा काढण्याचा अंदाज मला दिसत आहे," असा आरोप जरांगे-पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) केला आहे.

"एकीकडे म्हणायचे तातडीने मार्ग काढून दुसरीकडे पाच-पाच दिवस कोणताही निर्णय घेतला जात नाही. हा सरकारचा डाव असू शकतो. सरकारला मराठ्यांची काळजी असती, तर मार्ग काढला असता," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

eknath shinde devendra fadnavis manoj jarange patil
Kalyan Kale : जरांगेंच्या आंदोलनाला वडेट्टीवारांनी विरोध केला असेल तर ते चुकीचे....

"माझ्या समाजाची लेकरं मोठी झाली पाहिजेत. यासाठी मी जिवाची बाजी लावली आहे. आमचा कुणी शत्रू नाही. एवढा विरोध मी पत्करला आहे, तो मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांसाठीच केला आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे," असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com