Sandipan Bhumre Meet Manoj Jarange : संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट; पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर झाली काही मिनिटांची चर्चा!

Manoj Jarange Latest News : उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
Sandipan Bhumre Meet Manoj Jarange
Sandipan Bhumre Meet Manoj JarangeSarakarnama

Maratha Reservation and Manoj Jarnge : मराठा समाजाला सगेसोयऱ्यासंह ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची मंगळारी चौथ्या दिवशी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी भेट घेतली.

पाऊण तासांच्या प्रतीक्षेनंतर जरांगे उठून बसले, त्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांना 'प्रकृतीची काळजी घ्या, वैद्यकीय उपचार घ्या. मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. इथून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोलतो. आमच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो. तोपर्यंत तब्येत सांभाळा, उपचारांना नकार देऊ नका, डाॅक्टरांना सहकार्य करा, अशी विनंती भुमरे यांनी केली.

यावर जरांगे यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, त्यानंतर खासदार भुमरे(Sandipan Bhumre) उपोषण स्थळावरून निघून गेले. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार भुमरे हे मुंबई आणि त्यानंतर दिल्लीला गेले होते. दरम्यान, 8 जून पासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले.

दुसऱ्याच दिवशी भुमरे यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेले होते. आज सकाळी भुमरे दिल्लीहून संभाजीनगरात परतले. त्यांच्या संपर्क कार्यालयात अनेक राजकीय नेते, पोलिस प्रशासनातील अधिकारी यांनी भेट घेऊन खासदार झाल्याबद्दल संदीपान भुमरे यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

Sandipan Bhumre Meet Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : उपोषणाचा चौथा दिवस, बीपी लो, शुगर घसरली; जरांगेंच्या प्रकृतीने प्रशासन हादरले..

त्यानंतर सायंकाळी भुमरे यांनी अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांची भेट घेतली. उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे, शरीरातील साखरेचे प्रमाण घसरले. त्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डाॅक्टरांच्या पथकाने सांगितले आहे.

Sandipan Bhumre Meet Manoj Jarange
Sandipan Bhumare : भुमरे खासदार झाले, भाजपला हवंय पालकमंत्रीपद; शिरसाटांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरणार?

मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. दुपारी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. पण ते उपचार घेणार नाही, या निर्णयावर ठाम होते. तहसीलदारांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती वरिष्ठ पातळीवर दिली होती.

त्यानंतर काही वेळापुर्वी संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. परंतु पाऊण तास शेजारी बसूनही जरांगे पाटील बोलले नाही, ते प्रकृती बिघडल्याने झोपून होते. काही वेळाने ते उठून बसले, तेव्हा सात ते आठ मिनिटात भुमरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कुठलेही ठोस आश्वासन किंवा शब्द न देता भुमरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमच्याशी बोलतो सांगून निघून गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com