Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू...

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीमुळे जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते.

Vijaykumar Dudhale

Beed, 03 March : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली. त्यांना रविवारी रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. मात्र, आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते, त्यांच्यासमोरच जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांच्यावर संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहेत, त्यामुळे जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा संभाजीनगरमधील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील काही कार्यकर्ते हे आज सकाळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्या कार्यकर्त्यांच्या समोरच मनोज जरांगे पाटील यांना भोवळ आली. त्यांना तातडीने संभाजीनगरमधील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे, उपोषण करत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. तसेच, कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठा समाजातील सर्व सगे सोयरे यांना मिळावे, यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपोषण आंदोलन केले होते. या सर्व आंदोलनाचा परिणाम त्यांच्या तब्येत झाला आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

मराठा समाजातील (Maratha society) लाखो व्यक्तींना कुणबी दाखले मिळाले आहेत, ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शक्य झालेले आहे. मात्र, कुणबी दाखल्यांची सगेसोयऱ्याची जरांगे पाटील यांची मागणी अजूनही मान्य झालेली नाही. तसेच, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीमुळे जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. आमदार धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला भाग पाडले होते. त्यानंतर मात्र धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर जरांगेंनी धस यांच्यावर तोफ डागत माझ्यासाठी सुरेश धस हा विषय संपला, असे विधान केले होते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानकपणे बिघडली आहे, त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा तब्येत बिघडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. आताही त्यांना पुन्हा एकदा संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT