Namdev Shastri Maharaj : मराठा समाज आक्रमक, नामदेव शास्त्रींचा कीर्तनाचा कार्यक्रम करायला लावला रद्द

Sakal Maratha Samaj Namdev Shastri Maharaj Bhagwangad Bhandara Pune Dehu : नामदेव शास्त्री यांचे देहू येथील भंडारा डोंगरावर 7 फेब्रुवारीला प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता.
Namdev Shastri Maharaj 1
Namdev Shastri Maharaj 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांचा देखील मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.

या पार्श्वभूमीवर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून नामदेवशास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध विविध माध्यमातून करत आहे.

दरम्यान आता नामदेव शास्त्री यांचे देहू येथील भंडारा डोंगरावर 7 फेब्रुवारीला प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. नामदेव शास्त्री यांचे कीर्तन रद्द करावे याबाबतचे निवेदन अखंड मराठा (Maratha) समाज संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या आयोजकांना देण्यात आले होते.

Namdev Shastri Maharaj 1
Illegal Crop Insurance : अवैध पीक विमा मोठी कारवाई; मंत्री धनंजय मुंडेंच्या परळीसह राज्यात 96 सीएससींचे आयडी ब्लाॅक

या निवेदनात असे म्हणण्यात आले होते की, नामदेव सानप महाराज यांनी बीड (Beed) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असलेले आरोपी यांच्याबाबतीत समर्थनाची भूमिका घेतली. याबाबतची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. ज्या मंत्र्याच्या पाठबळावर आरोपीनी हे कृत्य केले. त्या मंत्र्याने जनतेचा रोष समजून राजीनामा द्यायला हवा. तर हे नामदेव महाराज त्यांची पाठराखण करत असल्याची गोष्ट समोर आली आहे.

Namdev Shastri Maharaj 1
Jaya Bachchan On Mahakumbh : 'सर्वात प्रदूषित पाणी कुंभमेळ्यात, जिथं...' ; जया बच्चन यांच्या वक्तव्याने नवा वाद उफळणार?

पुढाऱ्यांची पाठराखण संतांनी का करावी

वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून, पुढारी लोकांपासून, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब दूर राहिले पाहिजे. परंतु हे महाशय आरोपींना निकटवर्तीय म्हणणाऱ्या लोकांना सांप्रदायिक क्षेत्रात असता, तर संत झाला असता अशी उपमा देतात. हे महाराष्ट्राच्या साधू संताच्या भूमीला कधीच पटणारे नाही. महाराष्ट्राच्या संत परंपरेला नामदेव सानप यांनी काळिमा दिला आहे. त्यामुळे त्यांचे कीर्तन पुरोगामी आणि संताच्या भूमीमध्ये करण्यास त्यांना कोणताही अधिकार नाही. जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज संस्थान यांनी त्यांचे कीर्तन, प्रवचन रद्द करावे, अशी विनंती अखंड मराठा समाज यांच्यावतीने करण्यात आली आहे.

तर कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न; मराठा समाजाचा इशारा

अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी अनिकेत देशमाने म्हणाले, पुण्यातील मराठा सेवक महंत नामदेव शास्त्रींबद्दल आक्रमक झालेले पाहिला मिळतायत. पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येत्या 7 फेब्रुवारीला महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. परंतु नामदेव शास्त्री यांनी मयत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची आणि धनंजय मुंडे यांची या प्रकरणात पाठराखण केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे भंडारा डोंगरावर जाऊन तेथील कमिटीशी संवाद साधून निवेदन दिले. नामदेव शास्त्रींचे कीर्तन रद्द करावे, अन्यथा त्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. यानंतर मंदिर प्रशासनाने त्वरीत त्याची दखल घेत सात तारखेचे महंत नामदेव शास्त्रींचे कीर्तन रद्द केले आहे, अशी माहिती अनिकेत देशमाने यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com