Maratha Reservation : सरकारला फूटणार घाम, तब्बल 42 मराठा संघटना एकवटल्या; मनोज जरांगे पाटील अलिप्त?

Maratha Reservation Maratha Organizations Unite :बैठकीत सहभागी झालेले मराठे नेते म्हणाले, मराठा समाजासाठी 25 वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या संघटना एकत्र आल्यात. त्यांना व्यासपीठ नाही आणि मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेला नाही.
Maratha Organizations Unite
Maratha Organizations Unitesarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगेप पाटील लढत आहेत. त्यांनी नुकतेच त्यांचे होणारे आंदोलन स्थगित केले आहे. लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना वगळून तब्बल 42 मराठा संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांची मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षण परिषदेच्या अंतर्गत बैठक झाली.

बैठकीत सहभागी झालेले मराठे नेते म्हणाले, मराठा समाजासाठी 25 वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या संघटना एकत्र आल्यात. त्यांना व्यासपीठ नाही आणि मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पुन्हा मोठा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे.

Maratha Organizations Unite
"Santoh Deshmukh यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत..."; सुरेश धस यांची आगळीवेगळी प्रतिज्ञा

मराठा समाजाच्या परिषदेसाठी दहा मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू, असा इशारा मराठा संघटनांच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे. लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात सरकारसोबत चर्चेला प्राधान्य दिलं जाईल, मात्र दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग मोकळा असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्या बैठकीत विषयी त्यांनी सोशल मीडियातून माहिती देताना सांगितले आहे की, बैठकीला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व्हावे यासाठीचा लढा आणि मराठा समाजाच्या सामाजिक समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सारथी या संस्थेमार्फत महिला व शेतकरी यांच्याकरिता सक्षमीकरणाचा उपक्रम राबवण्यात यावा असे मत बैठकीत मांडले.

मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध

मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात मात्र सरकारशी वाटाघाटी करत नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे उपोषणाला बसायचे पण सरकारची चर्चा करायची नाही त्यांच्या या भूमिकेला विरोध असल्याचा सूर बैठकीत सहभागी होण्याआधी काही मराठा नेत्यांनी आळवला. सरकारबरोबर वाटाघाटी करून प्रश्न सोडवले पाहिजे,अशी भूमिका हवी, असे देखील काही नेते सांगत होते.

मराठा आरक्षण परिषदेच्या प्रमुख मागण्या

- ओ. बी. सी समाजाला ज्या ज्या सोयी सवलती लागू केल्या आहेत. त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू करा

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाने आरक्षणाची अमंलबजावणी करावी

महाराष्ट्रामध्ये ओ. बी सी प्रमाणे एस. ई. बी. सी (मराठा समाज) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी

कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालूका पातळीवर समिती गठण करावे. या समितीमध्ये मराठा समाजाच्या दोन प्रतिनिधींना घ्यावे.

महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करणे बाबत

मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णय यानुसार तपासून मागे घेण्यात यावेत

मराठा समाजाला एस. ई. बी. सी प्रवर्गा अंर्तगत 10% आरक्षण लागू केले आहे. सद्या ते न्यायप्रविष्ट आहे. ते राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कम मांडून आरक्षण टिकवावे

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम तातडीने चालू करावे.

Maratha Organizations Unite
Delhi Assembly : दिल्लीत पुन्हा इतिहास घडला; भाजपनंतर ‘आप’नेही घेतला मोठा निर्णय…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com