Solapur : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता आमच्यात फूट पाडायचं ठरवलं आहे का? आम्ही भाऊ भाऊ आहोत, आम्ही एकत्र येणारच. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात आता तुम्हाला मिठाचे खडे टाकायचे आहेत का? आमच्या तोंडाला घास आलेला आहे, त्यात माती कालवायचे ठरवले आहे का? असे सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना केले आहेत. (Manoj Jarange Patil's question to Deputy Chief Minister Ajit Pawar)
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आज (ता. २३ ऑक्टोबर) झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. त्यात त्यांनी ‘आरक्षणाला दोन बाजू आहेत, हे लक्षात घ्या. विशेषतः मराठा तरुण आणि तरुणींची मानसिकता समजून घेण्याची राहिलेली नाही. ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, तेही जरांगे पाटील यांच्या सभेला जाऊन बसतात. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही त्यांना विचारलं की, तुम्ही का गेला होता. तुम्हाला तर कुणबी सर्टिफिकेट आहे ना? तर सगळी जातात म्हणून आम्ही गेलो, असे ते सांगतात. जे कुणबी आहेत, त्यांना आरक्षण आहेच, असेही अजित पवार यांनी माढ्यात बोलताना म्हटले हेाते.
अजित पवार यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना आमच्यात फूट पाडायची आहे का? असा सवालच त्यांनी विचारला आहे. तुम्ही आता आमच्यात फूट पाडायचं ठरवलं आहे का. आम्ही भाऊ भाऊ आहोत, आम्ही एकत्र येणारच. तुम्ही आता याच्यासाठी बाहेर पडलात का. एवढे दिवस तर तुम्ही मराठा आरक्षणबाबत काही बोलले नाहीत. आंदोलनाच्या बाबतही त्यांनी आतापर्यंत काही भाष्य केलेले नाही. आता तुम्ही हे सुरू केले आहे का, सरकारने तुम्हाला याचसाठी पुढे केले आहे का?
आमच्यात एकी आहे, आम्ही भाऊ भाऊ आहोत. आमच्या ऐकी तुम्हाला आता पाहवत नाही का? तुम्हाला आमच्यासोबत यायचं नाही. पण, मराठा आरक्षणाच्या प्रश्नात तुम्हाला मिठाचे खडे टाकायचे आहेत का? आमच्या तोंडाला आता घास आलेला आहे, त्यात माती कालवायचे ठरवले आहे का? असे सवाल जरांगे पाटील यांनी अजित पवारांना केले.
मुख्यमंत्र्यांना इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मराठा समाजाने खाली पडू दिला नाही. समाजाने त्यांच्या शब्दाचा मानसन्मान ठेवला. आता असे चॉकलेट फेकून हाणायला लागलेत का तुम्ही आम्हाला? हातघाई करू नये, हातघाईला येऊ नये, हे आता तुम्ही आम्हाला शिकवायला लागले आहेत का? मराठा समाजाला दगाफटका केला तर तुम्हाला सोयीचं जाणार नाही, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.