manoj jarange rally in antarwali sarati Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : सभेपूर्वी जरांगे म्हणाले, ""मराठ्यांची वेदना सांगण्यासाठी आजची सभा; अंतरवाली सराटीत एल्गार

Mangesh Mahale

Antarwali Sarati :"मराठा समाजाची वेदना सांगण्यासाठी आजची (शनिवार) सभा आहे. आम्हाला दहा दिवसांत आरक्षण द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सभेपूर्वी सरकारला दिला. आज दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे. (Manoj Jarange Rally In Antarwali Sarati)

"आम्ही सरकारला वेठीस धरलेले नाही, आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. सरकारला दिलेली मुदत संपत आहे. शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलक सभेच्या ठिकाणी जमा होत आहेत. सभा झाल्यानंतर ते शांततेत आपल्या घरी जातील," (Manoj Jarange Rally In Antarwali Sarati Response)

सभेची तयारी पूर्ण झाली असून, काल (शुक्रवार) सायंकाळपासूनच राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत. शुक्रवारी रात्रभर आंदोलकांची वाहने सभा स्थळाकडे येत होती. रात्रीपासून बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, सांगली, अहमदनगर यासह अनेक जिल्ह्यांतील गाड्या बीडमार्गे अंतरवालीच्या दिशेने जात होत्या.

आज लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत आहे. सभेच्या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शंभर एकर जागेवर ही सभा होत आहे. अंतरवाली सराटीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंना पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात गाड्या दाखल झाल्याने 80 एकरमधली एक नंबरची पार्किंग फुल झाली आहे.

भगवे ध्वज, भगव्या टोप्या घालून 'एक मराठा लाख मराठा', अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली आहे. सभेसाठी १४०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून, सभास्थळी पाच डॉक्टरांसह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सभेच्या माध्यमातून परिसरात शाळांना सुटी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT