Nashik Drugs News
Nashik Drugs NewsSarkarnama

Nashik Drugs News : नाशिकच्या गुंडांना भुजबळ-भुसेंनी पोसलंय; राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics ; भुजबळ-भुसे हे दोन्ही नेते नाशिकच्या अधोगतीला जबाबदार आहेत
Published on

Nashik : नाशिक ड्रग्जच्या विळख्यात गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक शहराचे सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना उद्या पालकमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी त्यांच्या खटपटी सुरू आहेत. हे दोन्ही नेते नाशिकच्या अधोगतीला जबाबदार आहेत," असा आरोप राऊतांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ आणि पोलिस यंत्रणेवर राऊतांनी हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये वाढता ड्रग्जचा व्यापार आणि गुन्हेगारीवर राऊतांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले.

Nashik Drugs News
Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या घरी आढळले तीन किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

नाशिकचे आजी-माजी पालकमंत्र्यांनी गुंडांना पोसलंय, नाशिक ड्रग्ज प्रकरणाविरोधात ठाकरे गट येत्या 20 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात सामाजिक संस्था, नागरिक आणि पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन राऊतांनी आहे.

"हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नाही. या शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पालकांनीसुद्धा या मोर्चात सहभागी व्हावे, आपला निषेध व्यक्त नोंदवावा. यासाठी आमचे प्रयत्न राहतील, हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. हे राजकारण नाही, ज्यांना ज्यांना आमच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मग समाजिक संस्था किंवा राजकीय पक्ष असतील, पण या विराट मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे असेल, हा आमचा इशारा मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले.

Nashik Drugs News
Ajit Pawar Group : अजितदादा नक्कीच 'ते' स्वप्न पूर्ण करतील; मिटकरी, चाकणकरांचा सुळेंना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com