Manoj Jarange Vs Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Sanjay Shirsat : संजय शिरसाट आमच्या लेकरांचं वाटोळं करतायत; 'मराठा कुणबी' रोखण्यावरून मनोज जरांगेंचा संताप

Manoj Jarange Accuses BJP Devendra Fadnavis Shivsena Sanjay Shirsat Over Maratha Kunbi Records During Dharashiv Visit : कुणबी नोंदी आणि पडताळणी प्रमाणपत्र देत नसल्यावरून मनोज जरांगे यांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Pradeep Pendhare

Kunbi records controversy : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर संतापले आहेत. मराठी कुणबी पडताळणीचे प्रकरण अडवलं जात आहे. आमच्या तोंडावर प्रमाणपत्र द्यायला सांगतात, पण मागे अधिकाऱ्यांना दिरंगाई करण्याच्या सूचना दिल्या जातात, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी मंत्री शिरसाट यांच्यावर केला आहे.

अधिकाऱ्यांकडूनच ही माहिती मिळत असल्याचे सांगून, याचे परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला भोगावे लागतील, असा देखील इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

धाराशिव जिल्ह्यातील हजारो मराठा (Maratha) बांधवाच्या कुणबी नोंदी रोखल्या जात असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना, मनोज जरांगे म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, ही अडवणूक थांबवा. पुढच्या काळात जड जाईल. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही. प्रमामपत्र देऊन देखील पडताळणी प्रमाणपत्र दिले जात नाही. हा प्रकार ज्यांच्या मंत्रालयाच्या अख्यारीत येतो, ते मंत्री संजय शिरसाट यांना देखील तीन ते चार वेळा याबाबत लक्ष वेधलं आहे. अशी अडवणूक राज्यभर होत आहे".

धाराशिव, सोलापूर इथंच हा अडवणुकीचा प्रकार होत नाही, तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, सातारा, यवतमाळ, अमरावती, पुणे (Pune), नाशिक, अहिल्यानगर ही अडवणूक होत आहे. मंत्री शिरसाट यांना आम्ही म्हटलं की, आमच्या समाधानासाठी फोन करायचा, आणि नंतर पुन्हा असा मेसेज द्यायचा की, थांबवून द्या. मराठ्यांच्या पोराचं अॅडमिशन रोखलं गेलं पाहिजे. नोकरीची संधी हुकली पाहिजे, त्यानंतर प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला.

ही माहिती अधिकाऱ्यांकडून समजू लागली आहे. तसे काही अधिकारी देखील बोलू लागले आहेत. अधिकारी सांगत आहेत की, मंत्री महोदयांकडून असा निरोप आहे. मंत्री शिरसाटसाहेब एकीकडून मराठ्यांची मनधरणी करत आहेत, दुसरीकडून मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत आहे. संजय शिरसाट यांच्याविषयी आमची एकही तक्रार नव्हती. परंतु चार ते पाच वेळा सांगितलं आहे की, तुमचे अधिकारी संभाळा नाहीतर घेराव घालू. आता कुणबी प्रमाणपत्र, पडताळणी ज्या कार्यालयाकडून रोखलं जाईल, तिथं जिल्ह्याच्यावतीनं घेराव घालण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मंत्र्यांवर राज्यातील मराठ्यांना संशय

आंदोलनाची परिस्थितीला मंत्री संजय शिरसाट जबाबदार असतील. संबंधित अधिकाऱ्यांची नावे पाहिजे असल्याच त्यांची नावे देखील दिली जातील. मंत्र्यांवर देखील राज्यातील मराठ्यांना संशय यायला लागला आहे', असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना इशारा

'मुख्यमंत्र्यांना नी यात लक्ष घालून मराठ्यांच्या कुणबी नोंदा शोधा, प्रमाणपत्र द्या, पडताळणी लवकरात लवकर करू देण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. नाहीतर राज्यातील प्रत्येक कार्यालयाला घेराव घालू. अधिकाऱ्यांच्या मागे लागू. आमच्या लेकरांचं वाटोळं करायला निघाल, तर सरकारला कसं नीट करायचं हे देखील आम्हाला पक्क माहिती आहे', असे जरांगे पाटील यांनी ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT