Manoj Jarange Patil-Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला विरोध केला तर, ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या 16 टक्क्यांविरोधात कोर्टात जाऊ!

Manoj Jarange warns NCP leader Chhagan Bhujbal : आमचं ओबीसींशी भांडण नसून, सरकारशी भांडण आहे. सरकारने कामं केली तर कौतुक करू. जीआर ओके आहे, उगाच गैरसमज पसरवू नका.

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा मंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केली. एकीकडे मराठा समाजातील नेतेच सरकारच्या जीआरवर टीका करत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांना मात्र या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून या विरोधात न्यायालयात आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलात, तर ओबीसी आरक्षणात 1994 च्या जीआरनूसार घुसखोरी केलेल्या 16 टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे, सरकारने काढलेला जीआर ओक्के आहे, याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सरकारने आता हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली. आमचं ओबीसींशी भांडण नसून, सरकारशी भांडण आहे. सरकारने कामं केली तर कौतुक करू. जीआर ओके आहे, उगाच गैरसमज पसरवू नका. ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढतील, असा टोलाही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी लगावला.

मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलात, तर मग 1994 मध्ये सोळा टक्के आरक्षणाचा जीआर रद्द करण्यासाठी आम्हीही न्यायालयात जाऊ. आमच्या हक्काच्या नोंदी असून जर सरकार कोर्टात गेले, तर मग आम्हालाही हे करावंच लागेल, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाविरोधात लढण्यापेक्षा ओबीसी नेत्यांनी समाजासाठी लढावं, त्याने कल्याण होईल, आम्ही सरकारशी समाजासाठी लढलो आणि आरक्षण मिळवलं, असेही जरांगे यांनी सांगीतले.

कोणीही बॅनर लावा, पण आधी प्रमाणपत्र द्या..

राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे बॅनर झळकवले जात आहे. या संदर्भात विचारले असता, कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पेन करा, आम्हीही तुमचे आभार आणि कौतुक करूच. पण आता तातडीने प्रमाणपत्र द्या. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. कुणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या, कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT