Laxman Hake News : लक्ष्मण हाके पुन्हा गेवराईत, दंड थोपटत आमदार पंडित यांना दिले आव्हान!

Maratha activist Laxman Hake visits Georai again and directly challenges MLA Pandit : हाके-पंडित यांचे समर्थक पुन्हा आमने सामने आले तर मोठा राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News BeedSarkarnama
Published on
Updated on

OBC-Maratha News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडीत यांच्या समर्थकांमध्ये 26 आॅगस्ट रोजी जोरदार राडा झाला होता. हाके आपल्या समर्थकांसह गेवराईतून जात असताना पंडित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या हाकेंनी गाडीतून बाहेर येत दंड थोपटून पंडित समर्थकांना आव्हान दिले होते. त्यानंतर आज पुन्हा गेवराईत त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. तसेच दंड थोपटत त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना एक प्रकारे आव्हानच दिले.

गेवराईत हाके यांची सभाही होणार असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. हाके-पंडित यांचे समर्थक पुन्हा आमने सामने आले तर मोठा राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या उपस्थितीत गेवराई शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच लक्ष्मण हाके यांनी दंड थोपटत वज्रमूठ दाखवली. बाग पिंपळगाव आणि रेवकी देवकी या दोन्ही ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नाही तर मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
Laxman Hake : अजितदादा, तुम्ही रॉकेलचोराला विधान परिषदेत पाठवलं; ‘त्या’ मिटकरीमुळे कितीवेळा तोंडावर पडणार : लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

आंदोलनापुर्वी आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून झाल्यानंतर पंडित यांनी गेवराईत बॅनरबाजी केली. आधी आंदोलनाच्या समर्थनात तर आता मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे आभार व्यक्त करणारे बॅनर गेवराईत सर्वत्र लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह शेकडो समर्थक, कार्यकर्त्यांची रॅली आणि सभा यामुळे गेवराईतले वातावरण तापले आहे.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
Georai Assembly Election : तुम्ही विजयसिंहांच्या पाठीशी रहा; मी महाराष्ट्राची ताकद तुमच्या पाठीशी उभी करतो : अजित पवार

ओबीसी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून घोषणाबाजी आणि दंड थोपटून ते आव्हान देताना दिसत आहेत. याआधी 26 आॅगस्ट रोजी पंडित आणि हाके समर्थकांमध्ये गेवराईत तुफान राडा झाला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असताना ते गेवराईत दाखल झाले होते.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake News Beed
हाके-विजयसिंह पंडितांचे कार्यकर्त्ये भिडले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं | Beed News |

मांजरसुंब्यात वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी..

इकडे गेवराईत हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले, तर तिकडे मांजरसुंबा चौकात हाके यांच्यासमोर वाल्मिक कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते. मांजरसुंबा चौकात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते समोरासमोर आले होते. लक्ष्मण हाके कार्यक्रमासाठी जात असताना 'वाल्मीक अण्णा अंगार है, बाकी सब भंगार है, वाल्मीक आण्णा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा काही जणांनी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com