Manoj Jarange Criticise Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : छगन भुजबळांच ऐकून काँग्रेस अन् आपलं करिअर संपवू नका! विजय वडेट्टीवारांना इशारा

Manoj Jarange Patil Warn Vijay Wadettiwar : मराठ्यांनी सावध व्हा, सरकारने देखील सावध झालं पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. मी कधी स्वतःला नेता समजलेले नाही, मी मराठा आंदोलक हेच लावतो.

Jagdish Pansare

  1. मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना इशारा दिला की, “छगन भुजबळांचं ऐकून काँग्रेस आणि स्वतःचं करिअर दोन्ही संपवाल.”

  2. मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

  3. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि एनसीपीमध्ये नवीन तणाव निर्माण झाला आहे.

Maratha V/S OBC Reservation Controversy : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा टीका केली. छगन भुजबळांचे ऐकून काँग्रेस अन् आपलं करिअर संपवू नका, अशा इशाराच त्यांनी वडेट्टीवार यांना दिला. काँग्रेस पक्षाला आणि तुम्हाला मोठं करणमयात मराठा समाजाचा हात आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलांच्या मुळावर येऊ नये, मराठा आरक्षणावर बोलू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

छत्रपती संभाजीगगर येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manaoj Jarange Patil) यांनी ओबीसी मोर्चावरून काँग्रेस नेत्यांवर टीका केली. तुम्ही स्वतःला संपवून घेऊ नका, आणि मराठा ओबीसी वाद लावू नका.काँग्रेसने मोर्चाही काढू नये. तुमचं षडयंत्र बंद करा, मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाचं तुम्ही काहीच बिघडवू शकत नाही. उलट मराठा हा कुणबी आहे हे मान्य करा, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल.

तुम्ही येडपट आहे का, नेतेगिरीची हवा काढून टाका, भुजबळ (Chhagan Bhujbal) नादी लावून तुमचा गेम करेल. परळीच्या दोन्ही नेत्यांची अवस्था बघा, गाडी वॉशिंग करतात तसे विचार धुवून घ्या, शहाणे व्हा, अन्यथा काँग्रेस पक्षाचा बट्टा वाजेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ओबीसी नेत्यांची जी चिडचिड सध्या सुरू आहे, त्यातून षडयंत्र लक्षात येतं.

फडणवीस साहेब बरोबर वाटेवर आहेत, त्यांना आता लक्षात आले ते चुकीच्या वाटेवर होते. ज्यांना फडणवीस यांनी मदत केली तेच लोक आता फडणवीस यांचा गेम करत आहेत आणि हे फडणवीस यांच्याही लक्षात आले आहे, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला. वडेट्टीवार-भुजबळ भेटीचा दावा करतानाच 'तू भेटलेलाच आहे, दोन अडीच महिन्याचा हा विषय आहे. ते दिसायला लागले आहे.

तुम्ही भेटून ठरविलेले आहे, तू फडणवीस, अजितदादा, शिंदे यांच्यामागे लागला आहे. सर्वगोष्टींची बेरीज केली तर डाव शिजतोय खरा. हा मराठा ओबीसींना घातक आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सरकारने देखील सावध झालं पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. मी कधी स्वतःला नेता समजलेले नाही, मी मराठा आंदोलक हेच लावतो.

मी गरिबांचा मुलगा आहे, भुजबळ तू ओबीसी समाज तोडला, ओबीसींचा उपयोग फक्त तुला तुझ्या घराण्यासाठी करायचा आहे. तू जेलमध्ये जाऊन आला, तुला खायला भाकर नव्हती. भुजबळ ज्याचे खातो, त्याच्या पिठात लघुशंका करतो, असे सांगतानाच आमचे 16 टक्के आरक्षण दिले, आमच्यात दम आहे आम्ही परत घेतोय, असेही मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगीतले.

FAQs

1. मनोज जरांगे पाटील यांनी काय वक्तव्य केले आहे?
त्यांनी विजय वडेट्टीवार यांना उद्देशून सांगितले की, “छगन भुजबळांचं ऐकून स्वतःचं करिअर संपवू नका.”

2. हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आले?
हे वक्तव्य मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले.

3. विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?
वडेट्टीवार यांनी आम्हाला आंदोलन करण्याचा लोकशाहीने अधिकार नाही काय? असे म्हटले आहे.

4. छगन भुजबळ यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत काही वक्तव्ये केली होती, ज्यावरून जरांगे पाटील यांनी टीका केली.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या विधानामुळे काँग्रेस आणि एनसीपीमध्ये तणाव वाढण्याची तसेच मराठा आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT