Manoj Jarange's Sister Bharati Katare Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं, तर..."; मनोज जरांगेंची बहीण आक्रमक

Jarange's Sister Bharati Katare : सर्वपक्षीय बैठकीतही आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा होती

Sunil Balasaheb Dhumal

Jalna News : "माझ्या भावाने समाजासाठी खूप मोठा त्याग केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते गेल्या १७ वर्षांपासून लढा देत आहेत. तीन वर्षांपासून मी आंदोलन व उपोषण मंडपातच राखी बांधत आहे. माझ्या भावाचे काही बरे वाईट झाले, तर त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल," असा इशारा मनोज जरांगे पाटलांची मुलगी पल्लवी आणि बहीण भारती कटारे यांनी दिला आहे. (Latest Political News)

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर असून, निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवालासाठी एक महिन्याचा वेळ हवा आहे. त्यानुसार उपोषणकर्ते जरांगेंनी मंगळवारी आंदोलकांशी चर्चा करून महिनाभर उपोषण थांबवून आंदोलन सुरू ठेवले आहे. दोन आठवड्यांपासून उपोषण करत असल्याने जरांगेची प्रकृती खालावलेली आहे. हे पाहून त्यांची बहीण भारती भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या संवादामुळे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका होऊ लागली आहे. यातच जरांगेंची मुलगी पल्लवी आणि बहीण भारती यांनी आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांची मुलगी पल्लवी म्हणाली, "आता मराठा पेटून उठला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारला सांगते की, मला माझा बाप परत हवा आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि समाजाला आरक्षण द्यावे." तर बहीण भारती या भावुक झाल्या. (Maharashtra Political News)

"सरकार कुठलाच निर्णय घेताना दिसत नाही. सर्वपक्षीय बैठकीतही आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. सरकारचे प्रतिनिधी आले आणि उपोषण मागे घेण्यास सांगितले. यासाठी बैठक घेतली का?, असा प्रश्न भारती कटारेंनी सरकार व राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना विचारला आहे.

कटारे यांनी लाठीमारावरही भाष्य केले. भारती कटारे म्हणाल्या, "आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज केला. यात पोलिसांनी मुले-महिला असे काही पाहिले नाही. आंदोलक बेसावध होते. पोलिसांनी त्यांना ऑर्डर मिळाल्याशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही", असा आरोप करत "माझ्या भावाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही भारती कटारे यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT