Tanaji Sawant  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics: धाराशिवकरांना मिळणार मोठं 'गिफ्ट'; पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मागवला आराखडा

Tanaji Sawant On Maratha bhavan : धाराशिवमध्ये मराठा भवन होणार ? पालकमंत्र्यांनी प्रशासनाकडून आराखडा मागवला आहे.

Ganesh Thombare

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात मराठा भवनाच्या उभारणीसाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाकडून आराखडा मागवला आहे. प्रशासनाने आराखडा दिल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा भवन उभारण्यात येणार असून, धाराशिवकरांसाठी हे मोठं 'गिफ्ट' असणार आहे.

प्रशासकीय आणि अन्य कामांसाठी धाराशिवमध्ये येणाऱ्या मराठा समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी मराठा भवनाची उभारणी करावी, अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने पालकमंत्री सावंत यांच्याकडे रविवारी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर सावंत यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले.

धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा समाजातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हक्काचे ठिकाण म्हणून मराठा भवन आवश्यक आहे. प्रशासकीय कामे, गरजू विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, अभ्यासाची सोय असलेली सुसज्ज वास्तू आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने शहरात पालिकेच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून सुसज्ज अशा आण्णासाहेब पाटील मराठा भवनाची उभारणी करावी.

तसेच पंजाबराव देशमुख मराठा वसतिगृहासाठी शहरात वाढीव जागा द्यावी, अण्णासाहेब पाटील महामंडळाची दर महिन्याला आढावा बैठक घेऊन रखडलेली प्रकरणे निकाली काढावीत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, प्रवक्ते खंडू राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, अॅड. विश्वजित शिंदे आदींनी हे निवेदन दिले.

मराठा समाजातील मुलांसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची गरज आहे. सध्या मुलांसाठीचे वसतिगृह अपुरे असून, त्यासाठी विस्तारित इमारतीची गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Edited by - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT