Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत बीडसाठी केलेल्या घोषणांमध्ये नव्या कमी अन् जुन्याच योजना जास्त

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत 59 हजार कोटींच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
Marathwada Cabinet Meeting
Marathwada Cabinet Meeting Sarkarnama

Beed News: मराठवाडा मुक्ती संग्रामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटींच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणांचा मुसळधारच या बैठकीतून जणू धो-धो कोसळला.

बीड जिल्ह्यासाठीही याचा लोंढा आल्याचे सरकारी कागदपत्रांतून दाखविण्यात आले. पण यामधील अनेक योजनांच्या घोषणा या आधीच अनेदा झालेल्या आहेत. त्यामुळे बीडसाठी नव्या योजना कमी आणि जुन्याच योजना जास्त, असे चित्र पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी मंत्र्यांची उपस्थिती होती. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींच्या योजनांना मंजुरी देत घोषणा करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्यासाठीही भली मोठी योजनांची यादी या मंत्रिमंडळ बैठकीतून आली. मात्र, यातील अनेक योजनांची घोषणा याआधीच झाली होती.

Marathwada Cabinet Meeting
Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; सलाइन लावण्याची वेळ...

यामधील नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी मंजूर करण्यात आलेला निधी हा धोरणात्मक बाब आहे. केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर तेवढा समान निधी राज्य सरकारला द्यावा लागतोच. शिवाय, परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत केवळ सुधारित आराखडा झाला असून, परळी बस स्थानकाच्या यापूर्वीही घोषणा झालेल्या आहेत.

परळीला जाहीर करण्यात आलेली औद्योगिक वसाहतीचेही यापेक्षा वेगळे नाही. याबाबत अनेकदा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी यापूर्वी जिल्ह्यात सहा वसतिगृहे दोन वर्षांपूर्वीच मंजूर आहेत. त्यात दोनने वाढ करून आता आठचा आकडा करण्यात आला. आता घोषणा केलेल्या योजनांची मुहूर्तमेढ कधी रोवली जाणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे असणार आहे.

नव्याने कोणत्या घोषणा झाल्या ?

यामध्ये परळीत दोन कृषी विद्यालये, सोयाबीन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इमारत, साकुड येथे लाल कंधारी व देवणी व वंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशू पैदास प्रक्षेत्र उभारणी आदी काही नव्याने घोषणा करण्यात आल्या आहेत.

 • मंत्रिमंडळ बैठकीत बीडसाठी कोणत्या घोषणा ?

 • जायकवाडी टप्पा २ अंतर्गत जायकवाडीचे पाणी माजलगाव उजवा कालव्यात धावणार आहे. यासाठी ५३६ कोटींचा निधी देण्यात आला.

 • परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित २८६ कोटींचा आराखडा. अंबाजोगाईतील मंदिर विकासासाठी निधी.

 • ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव व बीड तालुक्यांत मुलींसाठी वसतिगृहे.

 • परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव व बीड तालुक्यांत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेतून मुलींसाठी वसतिगृहे व शाळा उभारण्यास मान्यता.

 • जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी ६३ कोटी ६८ लाखांचा निधी. बीडला सार्वजनिक बांधकाम विभागासाठी प्रशासकीय इमारत बांधकाम.

 • परळीला बस स्थानाकाच्या नूतनीकरणाच्या २८ कोटींचा सुधारित आराखडा. परळीला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र. परळीला शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाची स्थापना.

 • अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे लाल कंधारी व देवणी व वंश जतन व संवर्धनासाठी पशू पैदास प्रक्षेत्र उभारण्यास मान्यता.

 • परळी मतदारसंघातील मलकवाडी (कांगणेवाडी), उजनी, खो. सावरगाव, गोवर्धन तांडा, कन्हेरवाडी, वाका, मांडवा (परळी), पाडोळी, सारडगाव या साठवण तलावांना मान्यता. परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसीला मान्यता.

  Edited by - Ganesh Thombare

Marathwada Cabinet Meeting
Pimpri Chinchwad NCP : शरद पवार राष्ट्रवादीत तरुणाईचे नवे पर्व; आता रोहित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com