Manoj Jarange Patil : मी आज फक्त सत्य बाहेर पाडण्यासाठी बोलत आहे. उद्यापासून या सगळ्यांना मी विरोध करणार आहे. ज्यांनी भाजप उभी केली त्यांची परिस्थिती आज काय आहे. 'देवेंद्र फडणवीसांचे जे ऐकत नाहीत त्यांना ते मानेवर उलटे टाकतात आणि तोच डाव ते माझ्यावर करत आहेत'. सगेसोयऱ्यांची ओबीसीतील मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करुन टाकायचा आणि चारी बाजूंनी घेरायचा. हे राज्य ना एकनाथ शिंदे चालवतात ना अजित पवार, हे राज्य फक्त देवेंद्र फडणवीस चालवत असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
अंतरवाली सराटीमध्ये काल रास्ता रोको करण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसपींना मराठ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप जरांगे यांनी फडणवीसांवर केला. मराठा समाजाला घाबरविण्याचा प्रकार ते करत आहेत. "तुम्ही इथून मागं लोकं मोडली असतील, तुम्ही मराठ्यांना मोडू शकत नाही पण मराठा तुम्हाला मोडू शकतो", असा इशारा यावेळी जरांगेंनी फडणवीस यांना दिला.
भाजपला उभं करणारांची अवस्था...
मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजप उभं करणारांची वाईट अवस्था फडणवीस यांनी केली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. प्रथमच ते राजकीय भाष्य बोलले. ते म्हणाले, ज्या गोपीनाथ मुंढे यांनी भाजप उभी केली त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांची आज काय अवस्था आहे. ज्या माणसाला आज चालता येत नाही त्या एकनाथ खडसेंनी भाजप उभी केली. त्यांची आज परिस्थिती काय आहे. याला फक्त फडणवीस जबाबदार आहेत. यांच जर नाही ऐकलं तर तो मानेवर उलटे टाकतो आणि हाच डाव माझ्यावर करत असल्याचे जरांगेंनी सांगितले.
कोणाकोणाला हाताला धरले...
ओबीसींमधून मराठा समाजाला सग्यासोयऱ्यांसह आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरली आहे. मला या मागणीवरुन बाजूला करण्यासाठी बदनाम करण्याच काम सुरु आहे. त्यासाठी तुम्ही कोणाकोणाला हाताला धरले आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यासाठी माझ्यावर आज असे आरोप केले जात आहेत. गुलाबराव पाटील मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलतात. ते मराठ्याचा असल्यामुळे गिरीष महाजन आणि त्यांच्यात कलगीतुरा लावला. कसं कसं कोणाला गप केले हे सगळ्यांना माहित आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुश्मनी पत्करली ते सत्तेत कसे काय...
या पाच वर्षाचा विचार केला तर आजपर्यंत 75 वर्षात सर्व पक्षांच सरकार कधीच आले नाही. आपण राष्ट्रवादील विरोध केला तर ते आपले शत्रू झाले. शिवसेनेला विरोध केला तर ते आपले शत्रू झाले. भाजपला विरोध केला तर भाजप आपले शत्रू झाले. काँग्रेस, मनसेला विरोध केला तर ते आपले विरोधक झाले. मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली ते सगळे सत्तेत कसे काय? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. एकाच वेळी पाच पक्ष सत्तेत येत असतील तर मराठ्यांनी लांबचा विचार करायला पाहिजे. सगळे पक्ष सत्तेत आले आहेत पण मरणं आपल्या जनतेच असल्याचे जरांगेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.