Eknath Shinde News : मराठा समाजाला आरक्षण दिल्याने संयम राखावा; एकनाथ शिंदेंनी केले आवाहन

Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. काही जण हे आरक्षण टिकणार नाही, असे सांगत आहेत. त्यांना संधी मिळाली, पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Eknath Shinde
Ashok Chavan Latest News: आमदाराचा खासदार झाल्याचे अप्रूप, पण दोनदा मुख्यमंत्री झाल्याचा विसर?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबतच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांचे व्यक्तिमत्त्व हे दिलखुलास, खुल्या मनाचे आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शुभेच्छा दिल्या.

R

Eknath Shinde
Eknath Shinde News : ठरलं ! मुख्यमंत्री शिंदेंची 'धनुष्यबाण यात्रा' निघणार; 'या' शहरातून सुरूवात..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com