Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : धक्कादायक! लिफ्टला परवानगीच नव्हती! जरांगे पाटील यांच्या अपघाताच्या घटनेमुळे रुग्णालयाची गोची, आता होणार इन्स्पेक्शन

Manoj Jarange Patil Lift Crash Case : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमधील शिवाजीराव क्रिटिकल केअर या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. ते ज्या लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात असतानाच अपघात झाला होता. ज्यात जरांगे पाटील सुदैवाने बचावले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Aslam Shanedivan

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील रविवारी बीडमधील रुग्णालयात लिफ्ट अपघातात बालंबाल बचावले, लिफ्ट थेट पहिल्या मजल्यावरून खाली आदळली.

  2. लिफ्टमध्ये त्यांचे सहकारी होते; एकाला किरकोळ दुखापत झाली, दरवाजा फोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले.

  3. विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या चौकशीत लिफ्टला कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती, हे समोर आले आहे.

Beed News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील रविवारी (ता.3) एका विचित्र अपघातात सुदैवाने बचावले. यामुळे मराठा समाजाच्या काळजाचा ठोका चुकला होता. तर समाजात खळबळ घडाली होती. जरांगे पाटील बीडमधील एका हॉस्पीटलमध्ये एका रूग्णाला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ते ज्या लिफ्टमधून जात होते. ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. ज्यात त्यांच्या सहकाऱ्याला दुखापत झाली. तर लिफ्टचा दरवाजा तोडून सहकाऱ्यांनी जरांगे पाटलांना बाहेर काढले होते. आता झालेल्या चौकशीत त्या लिफ्टबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील लिफ्टबाबचा नवा विषय समोर आला आहे. विद्युत निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत त्या लिफ्टला परवानगी नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आता रूग्णालयाचे धाबे दणाणणे आहेत. (Maratha reservation activist Manoj Jarange Patil survives fall in unlicensed elevator at Beed hospital, inspection reveals shocking lapses)

मनोज जरांगे पाटील बीडमधील शिवाजीराव क्रिटिकल केअर या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. तेथेच हा प्रकार घडला. ते ज्या रूग्णाला भेटण्यासाठी गेले होते. तो दुसऱ्या मडल्यावर होता. त्यासाठी जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी लिफ्टने जात होते. पण पहिल्या मजल्यावर लिफ्ट पोहचली असतानाच ती थेट खाली ग्राउंड फ्लोअरवर आदळली.

या अपघातात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी लिफ्टमध्येच अडकले. तर यांच्या एका सहकाऱ्याला थोडी दुखापत झाली. यानंतर जरांगे पाटील यांना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढले.

तर आता या अपघातानंतर आता जिल्ह्यातील लिफ्टबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच ज्या लिफ्टचा अपघात झाला त्याची चौकशी करण्यात आली आहे. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली असून लिफ्टमध्ये अचानक बिघाड झाल्याने ती थेट ग्राउंड फ्लोअरवर आदळल्याचे उघड झाले आहे.

तसेच विद्युत निरीक्षक कार्यालयाकडूनही याबाबत खुलासा समोर आला असून रूग्णालयाला त्या लिफ्टला परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. पण रुग्णालयाकडून या लिफ्टचा परवाना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान या अपघातानंतर विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी केल्यानंतर त्या लिफ्टला परवानगी नाकारण्यात आली होती. लिफ्ट बंद करण्याच्या सूचना रूग्णालयास दिल्या होत्या. तर आता पुन्हा एकदा याचे इन्स्पेक्शन देखील केले जाईल अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांनी दिली आहे.

FAQs :

1. मनोज जरांगे पाटील यांना अपघातात मोठी इजा झाली का?
नाही, ते सुदैवाने बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

2. ही लिफ्ट कायदेशीर होती का?
नाही, विद्युत निरीक्षकांनी स्पष्ट केलं की लिफ्टला कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती.

3. लिफ्ट अपघातामुळे काय परिणाम होऊ शकतात?
रुग्णालय प्रशासनावर कारवाई होण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्यातील लिफ्ट सुरक्षेचा आढावा घेतला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT