
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीड दौऱ्यावर असताना लिफ्ट अपघातात सापडले.
पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळली, मात्र ते सुखरूप बचावले.
या घटनेमुळे समर्थकांमध्ये घबराट पसरली, परंतु मनोज जरांगे पाटील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
Beed News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज (ता.3) बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी जात होते. यावेळी झालेल्या लिफ्ट अपघातातून ते आणि त्यांचे सह सहकारी थोडक्यात बचावले. पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तर लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटील यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. तर सुदैवाने जरांगे पाटील थोडक्यात बचावले. सध्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. यावेळीच ही घटना अचानक घडली. या घटलेल्या घटनेनं सध्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून सगळीकडे जरांगेच्या बद्दल विचारणा केली जात आहे.
दरम्यान लिफ्टचा अपघात घडल्यानंतर ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळली. यावेळी त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांना बाहेर काढले. तसेच या अपघातातून जरांगे यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप बाहेर आले आहेत. यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. मनोज जरांगे यांच्यावर लाखो मराठा कार्यकर्त्यांचे प्रेम असून त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी बीडमधील विविध घटनांवरुन सरकार व पोलीस प्रशासनाला धारेवर धरले असून विविध मागण्यांसाठी चर्चा केली आहे. ज्यात ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील चर्चा केली आहे. तसेच विविध प्रकरणात ते विविध ठिकाणी जात आहेत. अशाच आजच्या एका भेटीदरम्यान जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
1. मनोज जरांगे पाटील यांना अपघात कधी व कुठे झाला?
आज बीड दौऱ्यात लिफ्टचा अचानक बिघाड होऊन ती पहिल्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली.
2. या लिफ्ट अपघातात मनोज जरांगे यांना काही दुखापत झाली का?
नाही, सुदैवाने ते सुखरूप बाहेर आले असून कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही.
3. या घटनेमुळे काय परिणाम झाला?
समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले, मात्र दौरा काही काळ थांबवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.