
Beed, 01 August : बीडमधून महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला निघाल्यावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटू नये, यासाठी धनंजय मुंडे हे सारखे फडणवीसांकडे चकरा मारत होते. एवढा मोठा माणूस अशी चिल्लर थेरं करतोय. मुलाच्या न्यायासाठी वृद्ध आई-वडील वणवण फिरत आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये; म्हणून तुमच्याकडे पाच ते सहा चकरा मारता, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना विचारला. याचवेळी त्यांनी ‘अजितदादांनी तर त्यांना हुसकावून लावले,’ असा दावाही जरांगे पाटील यांनी केला.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बोलत होते. ते म्हणाले, काहीही करून बीडमधील लाभार्थी टोळी नेस्तानाबूत करायची आहे. जोपर्यंत हा मनोज जरांगे पाटील आहे, तोपर्यंत दुसरा आरोपी यात गुंतवायचा नाही. एक वर्षात तीनशे ते साडेतीनशे लोकांना जेलमध्ये घालतो, हा मनोज जरांगे पाटील याचा तुम्हाला शब्द आहे. तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, महादेव मुंडे यांच्या खुनानंतर त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे आणि तुम्हाला मंत्रिपदाचे पडले आहे. परवाचा खेळ तुम्हाला माहिती नाही, बीडमधून महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला निघाल्यावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटू नये, यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सारखे फडणवीसांकडे चकरा मारत होते. मुलाच्या न्यायासाठी महादेव मुंडेंचे वृद्ध आई वडिल वणवण फिरत आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये; म्हणून प्रयत्न करता?
मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की, महादेव मुंडे खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे. लाभार्थी टोळीला आम्ही नीट करणारच, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला. चूक नसेल तर तुम्हाला काय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले, परळीवाल्यांनी संधी दिली म्हणून त्यांना हे करता आलं. तुम्ही संधी दिली नसती तरी हे करता आलं नसतं. परळीत दलित, मुस्लिम आणि मराठ्यांचा अशा ज्वाईंट करतो, ते म्हणाले पाहिजे की त्यांच्या वाऱ्याला जायचं टेन्शन यायला लागलं आहे. दोनच फोन लावलं फक्त आणि मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळाला पहिजे, त्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची विनंती केली.
जातीला न्याय देण्यासाठी मंत्रिपद पाहिजे, असे म्हणत असाल तर तुमच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवू. पण, जातीचं लोकं मारण्यासाठी तुम्हाला मंत्रिपद पाहिजे का?, आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजे का? महादेव मुंडे व इतर खून प्रकरणाचा तपास लागेपर्यंत अजितदादांनी त्यांना (धनंजय मुंडे) जवळ करू नये; अन्यथा आम्ही तुमचे सर्व लोक पाडून टाकू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, महादेव मुंडे प्रकरणाचे 70 ते 80 टक्के काम झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर जाताना ताई तू आणि तुमची दोन्ही मुलं बघणार आहेत. मंत्रिपद विकासासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी मागितले जाते. पण त्यांना केलेले खून पचविण्यासाठी, आरोपींना पळवून लावण्यासाठी, भ्रष्टाचार लपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजे. पण, इथून पुढे आम्ही असं होऊ देणार नाही.
बीड जिल्ह्यात एकही गाडी फिरू देणार नाही
महोदव मुंडे खून प्रकरणातील सर्व आरोपींना आठ दिवसांत अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात आम्ही एक गाडीसुद्धा फिरू देणार नाही. बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जाईल. एकही रस्ता सुरू होणार नाही, असा इशारही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.