Maratha protesters during an incident involving MLA Balaji Kalyankar and Anand Bondharkar. sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या दोन आमदारांना पिटाळले, जोरदार घोषणाबाजी!

Balaji Kalyankar Anand Bondharkar Nanded Politics : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. मात्र, सरकारकडून अजून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

Roshan More

Balaji Kalyankar News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतले व सलाईन लावण्यासही परवानगी दिली.

मात्र हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्रांचे प्रत्यक्षात वाटप सुरू होत नाही तसेच मुंबई, सातारा, औंध गॅझेट लागू होत नाही तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच राहणार, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते. दरम्यान,त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेय

आज नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात मराठ आंदोलकांकडून आंदोलन, निदर्शने करत असताना तिथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर हे जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.

मात्र इतके दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर गप्प असलेल्या या दोन्हीही आमदारांविरोधात आंदोलक प्रचंड आक्रमक झाले. या दोन्ही आमदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलकांचा रुद्र अवतार आणि घोषणाबाजी थांबत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंद बोंढारकर यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. आपल्या गाड्या उभ्या असलेल्या दिशेने जात त्यांनी निघून जाणे पसंत केले.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा

न आंदोलकांचा आपल्याला कुठलाही विरोध नाही, आपल्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली नाही. आमचा पूर्वनियोजित दुसरा कार्यक्रम असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषण आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवत आम्हीच आंदोलनातून निघालो, अशी प्रतिक्रिया आमदार आनंद बोंढारकर यांनी माध्यमांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT