Beed News: राज्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असून राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
अनेक नेत्यांनी आपले दौरे रद्द केले आहेत. तर बीडमधील माजलगावमध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून, आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड करत आग लावण्यात आली. यानंतर आता आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीलाही आग लावली आहे.
आरक्षणाची मागणी करत मोठ्या जमावाने माजलगाव नगर परिषदेत जात जाळपोळ करत इमारतीला आग लावली. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण तायार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जरांगे पाटील करत आहेत. मात्र, मराठा समाजाचा संयम आता सुटताना दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड करत आग लावल्यानंतर जमावाने माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीलाही आग लावली. आग लावल्यानंतर इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत होते. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.