Prakash Solanke : मराठा आंदोलनाला हिंसक वळण: राष्ट्रवादीचे आमदार सोळंकेंच्या बंगल्यावर दगडफेक, गाडी जाळली..

Maratha protesters : आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केली.
Prakash Solanke
Prakash SolankeSarkarnama
Published on
Updated on

Beed : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची वादग्रस्त टिपण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. नागरिकांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करीत वाहनांची जाळपोळ केली. बंगल्याची तोडफोड केली.

Prakash Solanke
Maratha protesters: मराठा आरक्षणाची धग आता दिल्ली दरबारी; जंतर-मंतर येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुरुवातीला जिल्ह्यात साखळी उपोषणे झाली. मात्र, मागच्या दोन दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बसची जाळपोळ, अचानक रास्ता रोको, असे प्रकार होत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाची आँडीओ क्लीप समोर आली आहे. यावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

सोमवारी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारो नागरिक जमले. त्यांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात सुरवात आली. यात बंगल्याच्या सगळ्या काचा फुटल्या. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये घुसून चारचाकी वाहनांना आग लावली. आगीनंतर बंगल्यातून ज्वाला आणि धुरांचे लोट बाहेर निघत होते. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केली.

Prakash Solanke
Maratha Reservation: सांगलीत सर्वपक्षीय एकवटले; मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी सत्ताधारी रस्त्यावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com