Dharashiv : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे, म्हणून मनोज जरांगे-पाटील आक्रमक झाले आहेत. जरांगे-पाटील यांची भेट घेत बच्चू कडू यांनी सरकारचा निरोप दिला होता. लवकरच यावर तोडगा काढण्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त करीत मराठा समाजाला 39 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे सांगितले होते. त्यावरून बच्चू कडू यांना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी टार्गेट केले आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) हे मागील तीन-चार दिवसांपासून ओबीसीच्या अन्नात माती कालवायचे काम करीत आहेत. ओबीसी हा गरीब समाज आहे. शेवटी बच्चू कडू यांना निवडून आणण्यात ओबीसींचा मोठा वाटा आहे, अशा शब्दांत ओबोसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी बच्चू कडूंना टार्गेट केले. पुढे येणाऱ्या निवडणुकीतही तुम्हाला ओबीसीच्या मतांची गरज पडणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
54 लाख नोंदी आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना धरून पाच जरी धरले तरी तो आकडा दोन ते अडीच कोटींवर जाईल. या सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घेण्याची भूमिका आहे. ती सरकार पूर्ण करण्याच्या स्थितीमध्ये आहे. काल 57 लाख दाखले देणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी स्वतः सांगितले. हे कुठले दाखले आहेत ? यात 1967 पूर्वी दिलेल्या दाखल्यांचा समावेश आहे का? असा प्रश्नही शेंडगे यांनी यावेळी उपस्थित केला.
हे शासन मराठ्यांना आणि ओबीसींना फसवत आहे. याचं 'दूध का दूध आणि पानी का पानी' झालं पाहिजे. गरीब समाजाच्या आरक्षणाचे तीन तेरा वाजल्याशिवाय हे सरकार राहणार नाही, असे दिसते. मागासवर्ग आयोगसुद्धा हायजॅक करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. मराठा समाजाचे सर्वेक्षण करताना शिक्षकांना खोटं सर्वेक्षण करण्याचे सरकारने सांगितले आहे. हे सरकार मराठा व ओबीसीची फसवणूक करीत असून खोटे सर्वेक्षण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत, असेही शेंडगे यांनी यावेळी सांगितले.
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.