Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : 'जीआर'मधून फसवणूक झाली म्हणणार्‍या मराठा अभ्यासक अन् नेत्यांना जरांगेंनी दाखवला आरसा, म्हणाले, "आता जे बोंबलत आहेत ते बैठकीला..."

Maratha Reservation GR : मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेला जीआर म्हणजे एक प्रकारची फसवणूक असून या जीआरमध्ये काही विशेष नाही, जे आधी दिलं होतं तेच सरकारने आता दिलं आहे, अशी प्रतिक्रिया काही मराठा नेते आणि अभ्यासक देत आहेत.

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 04 Sep : मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेला जीआर म्हणजे एक प्रकारची फसवणूक असून या जीआरमध्ये काही विशेष नाही, जे आधी दिलं होतं तेच सरकारने आता दिलं आहे, अशी प्रतिक्रिया काही मराठा नेते आणि अभ्यासक देत आहेत.

या प्रतिक्रियांमुळे मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कोणताही संभ्रम करून घेऊ नका, असं आवाहन केलं आहे. शिवाय जे आता मराठ्यांची फसवणूक झाली असं म्हणत आहेत त्यांचा देखील जरांगेंनी समाचार घेतला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणार, आमच्यात कुणीही कितीती संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कुणावर विश्वास ठेवणार नाही आणि मीही कुणावर ठेवत नाही.

कारण माझ्या समाजाला माहिती आहे की आता जे बोंबलत आहेत ते आधी कुठे होते? ते बैठकीला येत नाहीत, मुंबईला बोलवल्यावर येत नाहीत ते कुठेच नसतात फक्त टीव्हीवर असतात. उठलं की टीव्ही एवढ्यावरच ते असतात, अशा शब्दात त्यांनी अभ्यासक आणि मराठ्यांची फसवणूक झाल्याचं बोलणाऱ्या नेत्यांना टोला लगावला.

तर या अभ्यासकांना मला बोलवायचं देखील नव्हतं पण मुंबईतील बांधव म्हणले की सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे म्हणून त्यांना बोलावलं. शिवाय त्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संभ्रम होणार नाही. कारण मी जेवढं त्यांच्या लेकांसाठी लढतोय एवढं कोणीही लढणार नाही, असं जरांगे म्हणाले.

तसंच यावेळी त्यांनी थोड्यात दिवसांत मराठवाड्यातील सगळा मराठा आरक्षणात घातल्याचं मराठ्यांना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा गॅझेटबाबत सरकारने हयगय करता कामा नये. एक दोन महिन्यात नव्हे तर काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय घ्या जर हे झांलं नाही तर मी पुन्हा तुमचं रस्त्यावर फिरणं बंद करेन, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT