Manoj Jarange Hunger Strike Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलनावर ठाम; 'सगेसोयरे' अंमलबजावणी फसवणूक...

Manoj Jarange Hunger Strike : 20 तारखेनंतर समाज आंदोलनाची दिशा ठरवेल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Roshan More

Maratha Reservation News : गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज (शुक्रवारी) आपली भूमिका जाहीर केली. सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी करत आहे. आपण आंदोलनावर ठाम आहोत. 20 तारखेपर्यंत आंदोलन करणार. 20 तारखेनंतर समाज आंदोलनाची दिशा ठरवेल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. 'सगेसोयरे'च्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकार फसवणूक करत आहे, असा आरोपदेखील मनोज जरांगे यांनी केला. (Manoj Jarange Hunger Strike )

सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देत आहाेत. तेदेखील समाजाने घ्यावे. ज्या मार्गाने मिळते त्या मार्गाने घेतले पाहिजे. आम्ही मुंबईला गेलो आमची गोड बोलून फसवणूक केली, असे काहींना वाटत आहे. मुंबईला जाण्यात फसवणूक झाली नाही. मात्र, अंमलबजावणीमध्ये फसवणूक होत आहे. सरकारला वाटत असेल की स्वतंत्र आरक्षणातून 'सगेसोयरे'च्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करतील तर तसे होऊ देणार नाही, असे मनोज जरांगे (Manoj Jarange ) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर, अंतरवाली सराटीपासून सर्व महाराष्ट्रात दाखल करण्यात आलेले, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, हैद्राबादचे गॅझेट लागू करा, शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढवून द्या, या आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहाेत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण हे आम्हाला मान्य नाही. सगेसोयरे कायदा करा, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. 20 तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आमच्या आंदोलनामुळे मागासवर्ग आयोग गठीत झाला. राज्यातील सर्व मराठा हा कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी आहेत. जे मराठे लढले, त्यांच्यासाठी हा मागासवर्गीय अहवाल आला. ज्यांना कुणबीमध्ये आरक्षण नकोय, त्यांनी ते आरक्षण घ्यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT