Madhav Bhandari News : 12 वेळा चर्चा आणि 12 वेळा अपेक्षाभंग! माधव भांडारींच्या मुलाची पोस्ट चर्चेत

BJP News : चिन्मय यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडील अर्थात माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितले आहे.
Madhav Bhandari, Narendra Modi
Madhav Bhandari, Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जनसंघ ते भाजप असा तब्बल पाच दशके प्रवास करत पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या नशिबी कायम अपेक्षा आली. माधव भंडारींचं नाव आजपर्यंत 12 वेळा विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आले, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळाले नाही आणि याविषयीची खंत भांडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून केली आहे. ही पोस्ट सध्या राज्यभर चर्चेत असून निष्ठावंत भाजप कार्यकर्ते ही पोस्ट वाचून आपल्याच भावना यात व्यक्त होत असल्याचे बोलत आहेत. (Madhav Bhandari News)

Madhav Bhandari, Narendra Modi
Sanjay Raut : 'शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकणे, हे सरकारला...'; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अवघ्या दोन महिन्यांवर देशातल्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल. त्यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि तिकिटासाठी सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल होत असल्याचे दिसत आहे. त्यावर येणाऱ्या लोकांना दिलेल्या संधींमुळे पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता चिन्मय भांडारी यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

चिन्मय यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडील अर्थात माधव भांडारी (Madhav Bhandari) यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. त्याचबरोबर माधव भांडारी यांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, यानंतर त्यांनी पक्षाकडून माझ्या बाबांना जे अपेक्षित फळ मिळायला हवे होते, ते मिळालं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

“मी सार्वजनिक आयुष्यापासून लांब राहतो. त्यामुळे असं काही मी याआधी कधीच बोललेलो नाही. त्याचबरोबर मला याचीही जाणीव आहे की मी त्यांनी उभ्या केलेल्या कर्तृत्वामध्ये फारशी भर टाकू शकत नसताना माझ्या एका कृतीमुळे ते उद्ध्वस्त होऊ शकेल. पण मी आयुष्यभर या सगळ्यावर मौन बाळगून होतो. पण आज बोलण्याची वेळ आली आहे असं मला वाटलं”, असंही चिन्मय यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

'माझ्या आयुष्यात 12 वेळा मी त्यांचे नाव विधानसभेसाठी किंवा वरच्या सभागृहासाठी चर्चेत आलेले पाहिले आहे. आणि 12 वेळा, ते अंतिम झाले नाही. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय देण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे.', असे देखील चिन्मय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

(Edited By Roshan More)

Madhav Bhandari, Narendra Modi
Aditya Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग; म्हणाले, 'मंत्रालय गुजरातला...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com