Manoj Jarange Hunger Strike : जस जशी जरांगेंची प्रकृती ढासळतेय, तस तसा मराठ्यांचा रोष वाढतोय...

Maratha Reservation News : "जरांगेच्या जिवाला काही झाल्यास.." समाजबांधवांचा थेट इशारा...
Manoj Jarange Hunger Strike
Manoj Jarange Hunger StrikeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा आरक्षणासाठी आता आर या पार अशा लढाईसाठी उतरलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन तातडीने मराठा आरक्षण लागू करावे, या आग्रही मागणीसाठी जरांगे उपोषणावर ठाम आहेत. आज सहाव्या दिवशी जरांगेंची प्रकृती ढासळली असून, त्यांचे समर्थक त्यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करत आहेत. यानंतर त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले आहे. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने समाजबांधवांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

प्रकृती ढासळत आहे -

मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटी या आपल्या गावी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज सकाळपासून ते पोटदुखीने विव्हळत आहेत. त्यांची प्रकृतीही खालावत आहे. शिवाय पोटदुखीनेही ते त्रस्त झाले आहेत. तसा त्यांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Hunger Strike
Maratha Reservation : जरांगे-पाटील पोटदुखीने जेरीस; प्रकृतीही खालावली, उपचारास नकार दिल्याने टेन्शन

मराठा समाज संतप्त -

जरांगे-पाटील याच्या अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावातील उपोषणस्थळी मराठा समाजातील लोक जमू लागले आहेत. जरांगे-पाटील यांच्या जिवाला काही झालं तर थेट मुंबईला जाऊ, असा इशारा इथल्या महिलांनी दिला, तर जरांगेंना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, अशाही प्रतिक्रिया येत आहेत. जरांगे-पाटलांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठोस आश्वासन दिले जात नसल्याबद्दलही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

अधिसूचनेची अंमलबजावणी करा -

राज्य सरकारने 27 जानेवारीला 'सगेसोयरे' (Sagesoyare) या शब्दाचा समावेश करून सरकारने अधिसूचना काढली होती. आणि त्यावर हरकती मागवल्या आहेत. मात्र, सरकारने आता या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून, सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Manoj Jarange Hunger Strike
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अधिवेशन, आमदार तनपुरेंनी सरकारला सुनावले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com