दिलीप दखणे
Manoj Jarange News : आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल, त्यांच्या पोराबाळांच कल्याण करायचे असेल तर निमंत्रणाची, प्रस्तावाची वाट पाहू नका. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगरांसह समान दुःख असणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. आपण सगळे मिळून यांना दणका देवू, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी ओवेसी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
अंतरवाली सराटी येथे मराठवाड्यातील जनजागृती शांतता संवाद रॅलीचा समारोप झाल्यानंतर आज (रविवारी) ते पत्रकारांशी बोलत होते. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी मनोज जरांगे पाटील यांनी प्रस्ताव दिला तर त्यांच्याशी चर्चा करू, या विधानावर मनोज जरांगे पाटील यांना विचारले तेव्हा त्यांनी आपली व्यापक भूमिका मांडली.
सर्वसामान्य वंचित दुर्लक्षित समाज घटकांनी एकत्र यावे. आपल्या सर्वांचे कल्याण होईल. निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांना मदत करून मतदान करून जात मोठी करावी. मला नेतृत्व करायचे नाही. त्याची हौस देखील मला नाही. मी मराठा सेवक म्हणून काम करीन, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
ओवीसी asaduddin owaisi यांच्या प्रस्वावर प्रश्न विचारला तेव्हा प्रस्तावाचं मला काय कळतंय, आपण समान दुःख असणारे बांधव आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर व इतर समाज आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि द्यायचा दणका. आपण सर्वांनी एकत्रित यायला समाज कुठे नाही म्हणतो.
एमआयएमचे नेते ओवेसी, प्रहारचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर व सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढणारे सर्वच मंडळी हे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल. आपण सत्ता परिवर्तन करू शकतो, असा आत्मविश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. 20 तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत कसं जुळते व काय जुळते.
फोनची वाट पाहण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होईल यासाठी एकत्र यायला हवं. सगळे समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल. स्वतःहून एकत्र येण्याने आपली जात मोठी होईल. भविष्यात ॲड.प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते ओवेसी, बच्चू कडू, राजू शेट्टी माझ्यासोबत एकत्रित येतील का हे मला माहित नाही? मात्र माझे मत आहे त्यांनी एकत्र यावे, निश्चितच बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही पाडायला मोकळे आहोत, मी प्रस्ताव प्रस्ताव देण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र सर्वांनी एकत्र यावे असे मला वाटते, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
प्रश्न समाजाचा आहे सर्वांनी उडी घ्यायची, जास्त विचार करायचा नाही जे होईल ते होईल, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, या ओवेसी यांच्या विधानावर मी पंकजा मुंडे यांना पाडा असं म्हटलं नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. मिस्त्री मुस्लिम, त्याच्या हाताखाली टोपले उचलायला मराठ्याचा पोरगा यांनी किती दिवस कष्ट करायचे व अन्याय सहन करायचा.
दलित मुलांनी किती दिवस कामगार म्हणून राबायच. आरक्षण असून फायदा का होत नाही? असा सवाल करतानाच किती दिवस ऊस तोडायचा याचा विचार बंजारा समाजाने करण्याची गरज असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले. हाकेंना आम्ही विरोधक मानलेलं नाही, त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही, असे म्हणत जरांगे यांनी हाके यांच्या प्रश्नावर बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.