Nitin Gadkari : भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय? नितीन गडकरींना टोचले कार्यकर्त्यांचे कान

Nitin Gadkari BJP Politics : नितीन गडकरी म्हणाले, कुठलाही माणुस जातीने नव्हे तर गुणाने मोठा असतो. मी लोकांना सांगितले मी जातपात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ.
 Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari News : आपल्या रोखठोक बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. भाजप इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे, याची आठवण करून देताना भाजपआणि काँग्रेसमध्ये फरक काय? त्यांनी जे केलं तेच काम आपण केलं तर आपल्या येण्याचा फायदा काय? अशा शब्दांत नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

गडकरी म्हणाले, लोकांनी ज्यांच्यावर नाराज होऊन आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. निवडून आल्यानंतर आपण जे काम आपण करायला नको ते केलं तर त्यांच्या जाण्यात आणि आपल्या येण्यात काय फायदा आहे?

गडकरी Nitin Gadkari म्हणाले, महाराष्ट्रात जातीवाद, झगडे सुरू आहेत. यात आपले नुकसान होईल असे मी बावनकुळे आणि फडणवीसांना म्हणालो. जातीवाद पाळायचा नाही. कुठलाही माणुस जातीने नव्हे तर गुणाने मोठा असतो. मी लोकांना सांगितले मी जातपात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ.

 Nitin Gadkari
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे भाषण संपताच 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा; बारामतीत नेमकं काय घडलं?

आपल्या पक्षात BJP जे संस्कार आहेत त्यात शॉर्टकट नाहीत. लालकृष्ण आडवाणी हे कायम म्हणायचे वुई आर पार्टी विथ डिफररन्स. चांगले दिवस आले म्हणून जुना संघर्ष विसरता कामा नये असे गडकरी म्हणाले.

आपल्या पक्षाचा अनुकूल काळ सुरू आहे. मात्र, समृद्ध आणि संपन्नतेच्या काळात सुख टिकवणे गरजेचे असते. भविष्यातली उद्दीष्टं लक्षात ठेवून काम केले पाहिजे.

चांगले दिवस आले की जुन्या काळातली प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष आपण विसरतो. मात्र आपण संघर्ष विसरायला नको, असा सल्ला ही नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

 Nitin Gadkari
Arjun Khotkar : अर्जून खोतकर आधी म्हणाले, "नाटकं करा"; आता अहोरात्र मेहनत घेण्याचे आवाहन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com