Stone pelting at Manoj Jarange’s Matori village
Stone pelting at Manoj Jarange’s Matori village Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या गावातील दगडफेकीचे पडसाद शिंगोरी, बोरगावमध्ये...

Mangesh Mahale

Maratha Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मातोरी गावात काल रात्री झालेल्या दगडफेकीचे पडसाद परिसरातील गावात उमटले. प्रा.लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या स्वागतासाठी जात असलेल्या ओबीसी समाजाने काढलेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याने काही काळ मातोरी परिसरात तणाव होता.

चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मध्यरात्री शिंगोरी फाटा, मातोरी-तिंतरवणी रस्त्यावर बोरगाव फाटा येथ रात्री उशिरा जमावाकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.

पोलिस प्रशासन आल्यानंतर या जमावाला पांगवण्यात आलें. मात्र या तोडफोडीमध्ये पाच ते सात गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान सध्या मातोरी आणि परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अभिवादन दौरा बीडच्या परळीत दाखल झाल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी गावात दगडफेक झाली.

लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी, मातोरी परिसरातील शृंगारवाडी फाट्यावर जाणाऱ्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत मोटार सायकल आणि मोठ्या वाहनांचे नुकसान झाले तर काही नागरिकांना दुखापत देखील झाली. दरम्यान आता सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांची दोन पथके मातोरी गावात दाखल झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी बीडच्या मातोरी गावातील दगडफेकीच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हाकेंनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मातोरी गावातील घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर गाडी फोडून किंवा दहशत माजवून कुणी जर कायद्याला चॅलेंज करीत असतील तर अशा लोकांचा मी निषेध करतो. असे म्हणत आता लाट्याकाट्यांचा काळ गेला असून आता आपण बुद्धीने चाललं पाहिजे, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील तरुणांना केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT