Nitin Gadkari:नेत्यांनो, गडकरींचे लीड का घटले? भाजपकडून चाचपणी सुरु

Nagpur Lok Sabha BJP Leader Nitin Gadkari Lead Decrease: आठवडाभरापासून बैठकांचा रतीब सुरू आहे. स्थानिक आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली जात आहे. बैठकांमध्ये आता कार्यकर्ता उघडपणे बोलायला लागला आहे
Nitin Gadkari News
Nitin Gadkari.Sarkarnama

Nagpur News: लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भातून भाजपचे दोनच खासदार निवडून आले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

पाच लाखांच्या मताधिक्यांचे त्यांनी टाग्रेट ठेवलं होतं प्रत्यक्षात एका लाख ३७ हजारांच्या मतांनी ते विजयी झाले आहे. विविध विकास कामे, केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपचे मताधिक्य घटल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांना पाठवून स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जात आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मताधिक्य का घटले, याची चाचपणी सध्या भाजपतर्फे केली जात आहे. यासाठी प्रभागनिहाय बैठका घेऊन कारणे जाणून घेतली जात आहे. यात सर्वांचा रोष नेत्यांवरच अधिक दिसून येत आहे. आम्ही काय केले हे विचारणापेक्षा तुम्ही काय केले हे सांगा असा उलट सवाल केला जात आहे. भाजपमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा फटका आगामी विधान सभेच्या निवडणुकीत बसण्याची भीती आता विद्यमान आमदार आणि इच्छुकांना सतावू लागली आहे.

Nitin Gadkari News
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शिलेदार तीन मुद्यांवरुन शिंदे सरकारला जेरीस आणणार

नागपूर शहरात विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय बैठका घेतल्या जात आहे. आठवडाभरापासून बैठकांचा रतीब सुरू आहे. स्थानिक आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली जात आहे. बैठकांमध्ये आता कार्यकर्ता उघडपणे बोलायला लागला आहे.

पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री होते. सध्याही राज्यात महायुतीचे सरकार आहे असे असताना कार्यकर्त्यांसाठी काहीच केले नाही. सत्तेचा लाभ विशिष्ट लोकांनाच देण्यात आला. एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणे पक्षाचा कारभार चालवला जात आहे.

Nitin Gadkari News
MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?

कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते. राजे नवे कार्यक्रम, उपक्रम, योजना आणल्या जातात आणि कार्यकर्त्यांना त्यासाठी दिवसभर राबवले जाते. खाली काय सुरू आहे, त्यांचे म्हणणे काय, नागरिकांना काय हवे, कशाची गरज आहे याचा कुठलाही विचार केला जात नाही. नितीन गडकरी केलेली कामे आणि जनसंपर्कामुळे निवडून आले. दुसरा कोणी असतात तर टिकाव लागला नसता असे कार्यकर्त्यांनी सुनावल्याचे समजते. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि नेत्यांविषयी निर्माण झालेली भावना कायम राहिल्यास विधानसभेतही भाजपच्या उमेदवारांचे काही खरे नाही, असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com