Maharashtra Monsoon Session 2024 : शेतकरी, महिला अन् युवकांसाठी अर्थसंकल्पात 'शिंदे गॅरंटी'; अजितदादांच्या पोतडीत नेमकं काय असणार?

Maharashtra Budget Session 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकते.
Maharashtra Monsoon Session 2024
Maharashtra Monsoon Session 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 28 June : आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं कंबर कसली आहे. राज्याच्या 2024-25 चा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार आहे. त्यात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोतडीतून शेतकरी, महिला, युवक वर्गांसाठी योजनांचा पाऊस पाडण्यात येणार असल्याचं समजते.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकेल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर गॅस मोफत दिले जातील. दोन कोटी कुटुंबांना याचा फायदा होईल. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल. अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. तर, 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील.

Maharashtra Monsoon Session 2024
Eknath Shinde On Fadnavis - Thackeray Meeting : ठाकरे - फडणवीस भेटीवर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,'ती लिफ्ट...'

लाडकी बहीण योजना

मध्य प्रदेशच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 1 कोटी 37 लाख महिलांच्या थेट बँक खात्यात महिन्याकाठी 1,250 रूपये जमा केले जातात. महाराष्ट्रात हा लाभ वय वर्षे 21 ते 60 पर्यंतच्या 3 कोटी 50 लाख महिलांना दिला जाणार आहे. त्यांना महिन्याकाठी 1,500 रूपये दिले जातील.

बारावी पास युवक-युवतींना 7 हजार

मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण युवक-युवतींना मासिक सहा ते सात हजार रूपये, आयटीआय डिप्लोमाधारकांना मासिक आठ हजार रूपये, पदवीधरांना मासिक 10 हजार रूपये किमान सहा महिन्यांसाठी देण्याची येतील.

Maharashtra Monsoon Session 2024
NCP MLA Meet Jayant Patil : अजित पवार गटातील आमदारांचे जयंत पाटलांशी गुफ्तगू; विधीमंडळात घेतली भेट...

अजून काय असेल पोतडीत?

मराठा, धनगर आणि ओबीसी समाजासाठी काही योजना लागू केले जाण्याची शक्यता आहे. तर, महिला आणि बालविकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न विविध सामाजिक महामंडळांसाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असू शकतात. शेतकरी कर्जमाफीसाठी तरतूद असणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

महाराष्ट्रात 'शिंदे गॅरंटी'

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं समाजातील पाच घटकांना 'गॅरंटी' घोषणांचा पाऊस पाडला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं मोदी गॅरंटी देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'शिंदे गॅरंटी' चमत्कार घडवील, या अपेक्षेने योजना जाहीर होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com