Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा बीडच्या सभेतून मराठा लोकप्रतिनिधींना सूचक इशारा, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Beed News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर रोजी संपत आहे. तत्पूर्वी शनिवार मनोज जरांगेची बीडमध्ये इशारा सभा पार पाडली. या सभेला प्रचंड जनसमुदाय उसळला होता, या सर्वांच्या साक्षीने मनोज जरागेंनी आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा केली आणि इशाराही दिला.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला चलो मुंबईची हाक दिली. 20 जानेवारी रोजी मुंबईत बेमुदत उपोषण सुरू करणार आहे आणि यासाठी आंतरवालीतून मनोज जरांगे(Manoj Jarange) हे समाजबांधवासह मुंबईच्या दिशेने पायी निघणार आहेत. याचबरोबर जरांग यांनी यावेळी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनाही सूचक इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे म्हणाले, ''जर मराठ्यांच्या लेकरांना नोटीस दिल्या, तर तुम्ही सर्वजण मायबाप म्हणून त्याच्या पाठिशी उभा रहा. मी या चंपावती नगरीतून आणखी एक घोषणा करतो. मराठा समाजाचे आमादार, खासदार आणि मंत्री मी या बीडच्या जाहीर सभेतून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठिशी उभा रहा.

हीच योग्य वेळ आहे, तुम्ही मराठ्यांना साथ देण्याची. जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठिशी उभा राहिला नाहीत, तर महाराष्ट्रातील मराठ्यांचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला या. मराठा बांधवांनाही त्यांना सांगा, मदतीला या अन्यथा दारतही उभा करणार नाही.''

याशिवाय ''आपल्या बाजूने तेच आपले नेते. फक्त मतं घेण्यापुरता दारात आला तर त्याला चप्पलांनी प्रसाद द्या. आमच्या जीवावर मोठे होता आणि आमचे मुडदे पाहून हसत बसतात. तुम्हाला लाज वाटत नाही का?'' असा सवाल मनोज जरांगेंनी यावेळी दिला.

याचबरोबर ''मी आणखी दुसरी घोषणा करतोय, या बीडमध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाच्यावतीने सांगतो आहे. मधल्या काळात सरकारला दहा ते बारा दिवस मिळत आहे, त्याच्या आत देता आलं तर बघा, अन्यथा एकदा जर आंतरवालीमधून मराठ्यांनी गाव सोडलं तर येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार.

त्यानंतर तुमचा आमचा विषय बंद, चर्चाही त्यानंतर बंद. आम्हाला मुंबईल यायची हौस नाही. आम्हाला आमच्या लेकरांना न्याय पाहिजे.'' असंही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT