मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेचे मैदान तर फुल्ल भरलेच. जागा न भेटलेल्या समाज बांधवांच्या गर्दीने बाजूचा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग देखील गर्दीने ब्लॉक झाला. सभास्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत रविवारी (ता. २४) संपत आहे. यानंतर काय याबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात सभा होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भव्य मैदानाला पाटील मैदान असे नाव देण्यात आले आहे. निर्णायक इशारा सभेला जिल्हाभरासह विविध जिल्ह्यांतून समाज बांधव दाखल झाले आहेत. शहरातून मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांची भव्य फेरी निघाली. फेरीला शहरात मोठी गर्दी झाली. शहरात जागोजागी मनोज जरांगे पाटलांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांनीही त्यांचे स्वागत केले.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन फेरी सुरु झाली. यानंतर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. या ठिकाणी जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
दरम्यान, सभास्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी अण्णासाहेब पाटील व विनायकराव मेटे(Vinayak Mete) यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण केले.
दरम्यान, सभेला महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी जमली आहे. गर्दीने मैदान गच्च भरले आहे. सभास्थळी बसायला जागा न मिळालेले समाज बांधव बाजूच्याच धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा राहिले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.