Bachchu Kadu - Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Bachchu Kadu News : ...तोपर्यंत बच्चू कडू जरांगे पाटलांच्या अंतरवालीत तळ ठोकून राहणार !

Maratha Reservation News : " मराठा पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला ? त्यांचा आरक्षणावर...1"

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटले असतानाच आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. अशातच रोखठोक विधानांमुळे चर्चेत राहणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची थेट अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी जरांगे पाटलांसारखे प्रामाणिक नेतृत्व फार कमी आहे. त्यांची समाजाला गरज असल्याचेही म्हटलं होतं.

आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फटकारलं आहे. त्यांनी मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे?, पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे का?,त्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा सवालही केला आहे. तसेच जोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, तोपर्यंत बच्चू कडू हे अंतरवाली सराटीतच तळ ठोकून राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सिंदखेडराजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांनी रक्तपात नव्हे तर रक्तदान अशी टॅगलाइन दिली आहे. या शिबिरात त्यांनी रक्तदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला.

आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन संवाद साधला आहे. तसेच यापुढेदेखील सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवाली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहेत.

कडू म्हणाले, निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकण्यासारखे करत आहे. तसाही ओबीसीला भेटलेले आरक्षण कमीच आहे. हे 52,55 टक्के आरक्षण जाते. त्यामुळे ओबीसींचा आरक्षण वाढून घ्या किंवा अ,ब,क,ड करावे. पण, पूर्णपणे नाही म्हटल्याने चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रियाही कडू यांनी या वेळी दिली.

तसेच, मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे?, पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे का?, याचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. (Maratha Reservation) याचवेळी जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक कार्यकर्ता समाजाला मिळत नाही. नि:स्वार्थ भावनेतून जरांगे यांनी मोठा लढा उभा केला आहे. कुठल्याही समाजाला असा कार्यकर्ता सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहावी, असेही ते कडू म्हणाले.

सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करतंय?

आमदार बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी, त्यांनी पुन्हा लढण्यासाठी उभं राहावं, असं मला वाटतं. मी त्यांच्याशी बोललो. ते मला म्हणाले, आरक्षणासमोरच्या अडचणींवर चर्चा झाली पाहिजे. सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करतंय? याची सर्वांना माहिती असायला हवी, असं जरांगेंचं म्हणणं असल्याचेही कडूंनी सांगितले.

" आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी...."

मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हटलं,आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे असलेले तज्ज्ञ आणि मनोज जरांगे पाटील तसेच त्यांचे सहकारी यांच्यात चर्चा व्हायला हवी. काही किंतू-परंतु असतील तर ते या चर्चेद्वारे समजून घेता येतील. त्यानंतर सरकार म्हणून आपले मंत्री जरांगे पाटलांशी चर्चा करतील. त्यांना आश्वासित करतील.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT