Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation Video : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, शरद पवारांचा शिलेदार भेटीला

MP Bajrang Sonawane Meets Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, हैद्राबाद गॅझेट लागू व्हावे अशा मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणाला बसले आहेत.

Roshan More

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी (ता. 22) सहावा दिवस होता. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तातडीने तोडगा काढवा यासाठी बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, हैद्राबाद गॅझेट लागू व्हावे अशा मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणाला बसले आहेत.रविवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता.

खासदार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यावेळी तेथे उपस्थित मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाची घोषणा दिली.

बजरंग सोनावणेंच्या पत्रात काय ?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल राज्यसरकारने घ्यावी यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोनावणे यांनी पत्र लिहिले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे.

त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये. त्यांचे उपोषण सोडविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे देखील पत्रात म्हटले आहे.

जालना, परभणी बंदला प्रतिसाद

मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी जालना, परभणीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 21) बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी बंद पाळण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT