Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : रोष कमी होईना, भाजप आमदाराला गावाबाहेर काढले!

BJP News : राम पाटील-रातोळीकर हे दत्त जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहराजवळ असलेल्या कामठा येथे आले होते.

Laxmikant Mule

Nanded Political News : मराठा समाजातील तरुणांचा लोकप्रतिनिधिनींवरील रोष कायम आहे. विविध पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी जिथे जातील तिथे त्यांना मराठा समाजातील तरुण आरक्षणचा जाब विचारत आहेत. (Maratha Reservation News) या लोकप्रतिनिधींनी गावात प्रवेश केला की त्यांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शासकीय कार्यक्रम, शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या बैठका उधळून लावण्याच्या घटना घडत आहेत. (BJP) असाच प्रकार भारतीय जनता पक्षाचे आमदार राम पाटील-रातोळीकर यांच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे‌. (Maratha Reservation) `मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काय केले` ? असा जाब विचारत विधानपरिषद सदस्य आमदार राम पाटील-रातोळीकर यांना संतप्त तरुणांनी गावाबाहेर काढले.

नांदेड‌ शहराजवळ असलेल्या कामठा (जिल्हा नांदेड) येथे दत्त जयंतीनिमित्त रातोळीकर आले होते. यावेळी त्यांना मराठा तरुणांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. (Nanded) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नांदेड जिल्ह्यात झालेल्या सभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषण, निवेदन, रास्ता रोको आंदोलन अशा विविध मार्गांनी लढा सुरू आहे. या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळत असतानाच लोकप्रतिनिधींना मात्र गावबंदी आणि काळे झेंडे, घोषणाबाजीचा सामना करावा लागत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रत्येक सभांना महाराष्ट्रातील विविध भागात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

बीड येथे झालेल्या इशारा सभेत त्यांनी मुंबईत जाऊन बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तर शासन पातळीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. या गावबंदीचा फटका खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार श्यामसुंदर शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना बसला.

विधानपरिषदेचे सदस्य राम पाटील-रातोळीकर हे दत्त जयंतीसाठी नांदेड शहराजवळ असलेल्या कामठा गावात आले होते. त्यांना गावातील सकल मराठा समाजाच्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केले ? याचा जाब विचारला व‌ 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा दिल्या. सकल मराठा तरुणांचा रोष पाहून आमदारांनी तिथून काढता पाय घेतला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT