Maratha Reservation In Maharashtra Latest News : मराठा आरक्षणासाठी सभा घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना धक्का बसला आहे. जरांगे पाटील यांची सभा होताच आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये जरांगे यांची सभा झाली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही सभा घेण्यात आली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या रेणापूरमधील सभेत नियमांचा भंग झाल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता जरांगे पाटील यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे राज्यात दौरे सुरू आहेत. जरांगे यांची रेणापूरच्या (पिंपळफाटा) येथे गेल्या आठवड्यात सभा झाली. सभेसाठी पोलिसांनी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ दिला होता. मात्र, येथील सभा रात्री साडे दहा वाजता सुरू झाली आणि रात्री साडे अकराच्या दरम्यान संपली. या सभेला जिल्ह्यातील हजारो मराठा समाजबांधवांनी गर्दी केली होती. पण सदरील सभेत नियम व अटींचा भंग झाल्याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणावर दाखल झाला गुन्हा?
आयोजक गोविंद पाटील, दत्तात्रय पाटील, अॕड. रमेश खाडप, कुलदीप सुर्यवशी, भागवत शिंदे, अॕड. श्रीकांत सुर्यवंशी, योगेश देशमुख, संतोष शिंदे, सुधाकर माने, विशाल भोसले, सुरेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. पोलिसांच्या कारवाईने उद्या मराठा समाजाची बैठक होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जरांगे पाटील यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद राज्य सरकार आणि प्रशासनाला बघवला नाही. पोलिसांच्या आडून राज्य सरकारने जाणीवपूर्वक ११ आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करू, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हा सरकारचा उद्देश समाजाच्या एकीतून हाणून पाडला जाईल, असे मराठा मावळा संघटनेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळुंके म्हणाले.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.