Maratha Reservation: 'गोळ्या घातल्या तरी...; जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil: 'मराठा समाज मुंबईत गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही...'
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. जरांगे-पाटील 20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.

या पार्श्वभूमीवरच बोलताना जरांगे-पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. 'आम्ही मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत, आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाहीत', असं जरांगे म्हणाले. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मात्र मराठा समाज एकदा मुंबईत गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही. वेळ प्रसंगी जीव पणाला लावू, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. 20 जानेवारीच्या आत सरकारने आरक्षण दिलं तर मराठा समाजाला मुंबईला जाण्याची गरज नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा असून सरकारने दिलेला शब्द पाळावा. आता आमचा नाईलाज असून आम्हाला आता मुंबईला जावेच लागेल', असंही जरांगे-पाटील म्हणाले.

आंदोलनाचा मार्ग कसा असणार ?

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी ते 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग तसेच आंदोलनाची सर्व सविस्तर माहिती गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बरोबरच या आंदोलनात मराठा समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेली आहे. तर यासाठी त्यांनी दोनदा सरकारला मुदत देत बेमुदत उपोषण स्थगित केलं होतं. आता मुंबईत (Mumbai) उपोषणाला बसण्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेतं, यावर त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.य

(Edited By - Ganesh Thombare)

Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांकडून भाजपची कोंडी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com