Manoj Jarange Yeola Rally Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : जरांगेंचे एकाचवेळी भुजबळ, पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर; फडणवीसांनाही इशारा

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मनोज जरांगे-पाटील यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकारपरिषद झाली...

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation In Maharashtra Latest News :

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा समाज हा मागास नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. काही यंत्रणा मराठा समाजाला मागास दाखवण्याचे काम करीत आहेत, असा आरोप छगन भुजबळांनी केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही यंत्रणा म्हणजे कोणत्या, ते त्यांनी सांगावं. त्यांना कळलंय मराठे आरक्षणात गेलेत. त्यामुळे बोलायचं म्हणून ते आता बोलत आहेत. ओबीसी बांधवांना विनंती आहे, आपण एकत्र आहोत. राजकारण्यांकडे लक्ष देऊ नका. जे खरं ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. मराठा आरक्षणात जाणार हे शंभर टक्के आणि Maratha समाज आरक्षणात गेलेला आहे, असे जरांगे म्हणाले.

जरांगे भुजबळांना काय म्हणाले?

आमची नियत साफ आहे. काल जी अधिसूचना जारी झाली आहे ती वाचून बघा. मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र द्यावे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सगळ्या ओबीसी बांधवांनाही त्यांचे जर कोणी सगेसोयरे राहिले असतील त्यांनाही आरक्षण मिळावं, असेहीआहे. कायदा दोन्हीसाठी आहे. आंदोलन आम्ही केलं. त्याचा लाभ आम्हाला मिळायला हवा. यात लाभ आमचाही झाला आणि ओबीसी बांधवांचाही झाला आहे. आमची नियत खराब असती तर ओबीसींना त्याचा लाभ मिळू दिला नसता. आमचं चांगलं होतंय तर त्यांचेही होऊ द्या, असा विचार आम्ही केला. त्यांच्या जुन्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळू द्या. होऊ द्या गोरगरिबांचं कल्याण बाकीचे आधीच श्रीमंत झालेत. आमची नियत सामान्य ओबीसी बांधवांसाठी खराब नाहीय. पण यांची (छगन भुजबळ) आमच्या सामान्य मराठ्यांबाबत नियत खराब आहे. त्यामुळे लागले ते पुन्हा बडबडायला. त्याने काहीही होणार नाही. आता याचा अर्थ असा, की हा कायदा पक्का आहे. ते (छगन भुजबळ) जितके बोलतील तितके समजायचं हा कायदा पक्का आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी आणि मराठ्यात भांडणं लावण्याचे काम भुजबळ करीत आहेत. त्यांना आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. पण आमच्यात भांडणं होत नाहीत. ओबीसी बांधवांत आणि मराठ्यांमध्ये भांडणं होत नाहीत, यामुळे त्यांचं (छगन भुजबळ) जास्त पोट दुखतंय. कारण आम्ही एकमेकांसोबत राहतो, खातो-पितो आणि उठतो-बसतो. आम्ही एकमेकांसोबत आनंदात आहोत. त्यामुळे त्यांचं पोट जास्त दुखतंय, असं जरांगे-पाटील म्हणाले.

एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी स्वागत केलं. यावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्हीही आम्हीच आहोत. ओबीसीही आम्हीच आणि एक मराठा लाख मराठाही आम्हीच. शेतकरीही आम्हीच आणि लढाऊ क्षत्रिय मराठेही आम्हीच. त्यामुळे दोन्ही आम्हीच आहोत, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे-पाटील यांनी दिले.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावरही जरांगे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकार मागे घेणार नसेल तर आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT