Mumbai : सरकारकडून मराठा आरक्षणाच्यासंदर्भात काढण्यात आलेल्या 'जीआर'नंतर वाशीत झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे-पाटील भावुक झाले. या विजयाचे श्रेय मराठाबांधवांचे आहे. हा विजय मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बांधवांचा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले. मला माझ्या जातीचा अभिमान आहे. आरक्षणाच्या वाटेतील खुटा उखडून फेकणार, असे चॅलेंजही जरांगे यांनी आपल्या भाषणातून दिले.
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात वाद झाला होता. तोच धागा पकडून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. काही जणांनी आरक्षणाला विरोध केला. मिळणार नाही, म्हणून डिवचले. मराठा-ओबीसी हे गावात एकत्र शांततेत राहतात. एकमेकांच्या उपयोगी पडतात. त्यांच्यामध्ये भांडण लावू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले. Manoj Jarange Speech ON Maratha Reservation
मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले, की सरकारने काढलेला जीआरची अंमलबजावणी झाली पाहिजे. जर, काही अडचण आली तर मी आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसेल. जे दिले आहे ते टिकले पाहिजे. आता आंदोलनाची पुढची दिशा अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेऊन लवकरच ठरवण्यात येईल, असेदेखील जरांगे यांनी जाहीर केले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.