Laxman Hake Vs Manoj Jarange Patil sarkarnama
मराठवाडा

Video Laxman Hake Vs Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाकेंचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर, 'आरक्षण खिरापत नाही...'

OBC Reservation Laxman Hake Vs Manoj Jarange Patil : कोणी माणूस उठतो आणि वेठीस धरतो. मला सरकारचा खेद वाटतो. मंडल आयोग कधी आला त्यांना माहित आहे का? असे म्हणत हाकेंनी मनोज जरांगेंची खिल्ली उठवली.

Roshan More

OBC Reservation :मंडल आयोगाला देखील चॅलेंज करावे लागले. ओबीसीमध्ये जाती कशा आल्या हे पाहावे लागेल. तसेच मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्याला लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आरक्षण म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही. ज्या कुणबी शब्दावरून आरक्षण मागितले जात आहे. ते आरक्षण मिळाणारे कुणबी आणि मराठ्यांचा काही संबंध नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

कुणबी प्रवर्ग वेगळा आहे. कोकणी कुणबी, दलेरी कुणबी, खैरे कुणबी, घाटोळी कुणबी, खेडूले कुणबी, खानदेशी कुणबी, काळे कुणबी, वऱ्हाडे कुणबी हे खरे कुणबी आहेत. मराठा समाजापेक्षा त्यांचे रितीरिवाज वेगवेगळे आहेत. त्यांचं सोयरेपण आणि राहणीमान दोन्ही वेगळं आहे. कुणबी या एका शब्दाला घेऊन ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, असे लक्ष्मण हाके Laxman Hake म्हणाले.

कोणी माणूस उठतो आणि वेठीस धरतो. मला सरकारचा खेद वाटतो. मंडल आयोग कधी आला त्यांना माहित आहे का? असे म्हणत हाकेंनी मनोज जरांगेंची Manoj Jarange Patil खिल्ली उठवली. ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या का? ओबीसी असेच आले त्यांचा कुठले सर्वेक्षण झाले नाही, त्यांना खिरापत वाटली? या पुढे असली मोघम वक्तव्य कुठल्याही नेत्याने करू नये, असे हाके म्हणाले तसेच 10 टक्के दिलेला आरक्षणातील सर्वेक्षण 100 टक्के बोगस आहे, असा गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT